जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / VIDEO: रात्रभर रांगेत उभं राहूनही नाही मिळाली लस; लसीकरण केंद्राबाहेरच नागरिकांचा राडा

VIDEO: रात्रभर रांगेत उभं राहूनही नाही मिळाली लस; लसीकरण केंद्राबाहेरच नागरिकांचा राडा

रात्रभर रांगेत उभं राहूनही लस न मिळाल्यानं नागरिकांनी लसीकरण केंद्रावरच गोंधळ घातला आहे.

रात्रभर रांगेत उभं राहूनही लस न मिळाल्यानं नागरिकांनी लसीकरण केंद्रावरच गोंधळ घातला आहे.

लसीकरण केंद्रात लशीचा पुरवठा होत नसल्यानं अनेकांना रात्रभर रांगेत उभं राहूनही लस मिळत (not get Vaccine) नाहीये. लशीचा एक डोस घेण्यासाठी नागरिकांना आठ-आठ दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मीरा रोड, 23 ऑगस्ट: गेल्या काही काळात देशात कोरोना रुग्णांची (Corona Cases in India) संख्या कमी झाली आहे. असं असलं तर पुढील एक दोन महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट (Corona Virus 3rd Wave) येण्याचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक लस घेण्यासाठी धडपडत आहेत. पण लसीकरण केंद्रात लशीचा पुरवठा होत नसल्यानं अनेकांना रात्रभर रांगेत उभं राहूनही लस मिळत (not get Vaccine) नाहीये. लशीचा एक डोस घेण्यासाठी नागरिकांना आठ-आठ दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत. अशीच एक घटना मीरा रोड येथील एका लसीकरण केंद्रात घडली आहे. याठिकाणी नागरिकांनी लस घेण्यासाठी रात्रभर रांगेत उभं राहिल्यानंतरही त्यांच्या पदरी निराशा आली आहे. रात्री ऑफलाइन लसीकरणाचा बोर्ड लावून सकाळी ऑनलाइन नोंदणी केलेल्या लोकांनाच लस दिल्याचा विचित्र प्रकार मीरा रोड येथील एका लसीकरण केंद्रात घडला आहे. हेही वाचा- Coronavirus: लस घेतलेल्यांसाठीही डोकेदुखी ठरतोय कोरोना; जाणून घ्या यामागचं कारण खरंतर, मीरा रोड येथील एका खाजगी शाळेत लसीकरण केंद्र उभारलं आहे. या शाळेच्या गेटवर ऑफलाइन लसीकरणाचा बोर्ड लावण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी रात्री एकपासूनच याठिकाणी गर्दी करायला सुरूवात केली. पहाटे पर्यंत ही गर्दी वाढतचं गेली. सकाळी याठिकाणी लसीकरणासाठी असंख्य लोकांनी गर्दी केली होती. असं असूनही संबंधित लसीकरण केंद्रानं केवळ ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या नागरिकांनाच प्रवेश दिला. यामुळे रात्रभर रांगेत उभं राहूनही लस न मिळाल्यानं नागरिकांनी लसीकरण केंद्रावरच गोंधळ घातला आहे.

जाहिरात

हेही वाचा- रात्रभर केली राखीची तयारी अन्..; पहाटेच्या कृत्यानं बहिणीला दिली आयुष्यभराची जखम नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेऊन पोलिसांना पाचारण करावं लागलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना शांत केलं आहे. तसेच संतप्त नागरिकांची समजूत घालून त्यांना परत आपापल्या घरी पाठवलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात