मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोना नियंत्रणासाठी मुंबई पालिकेचा खर्च हजार कोटींच्या घरात, आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

कोरोना नियंत्रणासाठी मुंबई पालिकेचा खर्च हजार कोटींच्या घरात, आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

BMC Corona Virus Update: ही बातमी मुंबई पालिकेच्या (BMC) खर्चासंदर्भातली आहे.

BMC Corona Virus Update: ही बातमी मुंबई पालिकेच्या (BMC) खर्चासंदर्भातली आहे.

BMC Corona Virus Update: ही बातमी मुंबई पालिकेच्या (BMC) खर्चासंदर्भातली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 23 ऑगस्ट: राज्यात (Maharashtra State) कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आता ओसरली आहे. अशातच मुंबईतही (Mumbai Corona Virus) कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेचा (Third Wave of Corona)इशारा देण्यात आला आहे. त्याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबई पालिकेच्या (BMC) खर्चासंदर्भातली आहे. मुंबई पालिकेनं कोरोनासाठी 2000 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. मार्च 2020 ते जुलै 2021 या कालावधीत पालिकेनं हे कोट्यवधी खर्च केल्याचं समजतंय. म्हणजेच प्रत्येक महिन्यात पालिका जवळपास 200 कोटी खर्च करत आहे.

कोरोनाची पहिल्या लाट मार्च 2020 ला आली. बीएमसीनं 14 जम्बो कोविड सेंटर आणि कोरोना केअर सेंटर सुरु केले. याव्यतिरिक्त कॉन्ट्रॅक्टवर कर्मचाऱ्यांची भरती, वैद्यकीय उपकरणे खरेदी, अत्यावश्यक सेवांशी संबंधित कर्मचाऱ्यांशी संबंधित हॉटेल खर्च, कोरोना बाधित भागात खाण्यापिण्याचा पुरवठा या आणि यासारख्या अन्य कामांसाठी पालिकेनं 1600 कोटी रुपये खर्च केलेत. या व्यतिरिक्त मास्क खरेदी, ऑक्सिजन प्लांट तयार करणं, औषधांची निर्मिता यासारख्या गोष्टीवर महापालिकेनं 2000 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई मार्च 2020 पासून कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. अशात आकस्मिकता निधीतून (contingency fund) 1632.64 कोटी रुपये खर्च केले. अन्य 400 कोटी रुपये खर्च करण्यासाठी मार्च 2021 मध्ये परवानगी घेण्यात आली.

अनिल देशमुखांच्या अडचणीत अधिकच वाढ, दोन सहकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल

पालिका प्रशासनाचं स्पष्टीकरण

मुंबई महापालिका प्रशासनानं स्पष्ट केले आहे की, कोविड नियंत्रणासाठी दर महिना 200 कोटी रुपयांची गरज आहे. जम्बो कोविड सेंटर, कोरोना केअर सेंटर आतापर्यंत तयार झालेत. त्यामुळे आता त्याची फक्त काळजी आणि देखभाल करणं आवश्यक आहे.त्यामुळे आता कोरोनाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता नाही, असं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

राज्यातील गोविंदा पथकांना मुख्यमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन, म्हणाले...

ऑक्सिजन प्लांटसाठी 400 कोटी रुपयांचा खर्च

मुंबईतल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता (Oxygen Crisis) भासली होती. त्यानंतर बीएमसीनं स्वतः ऑक्सिजन बनवण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर पालिका सद्यस्थितीत एकूण 12 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बनवणारे प्लांट तयार करत आहे. याशिवाय ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी केली जात आहे.या सगळ्यासाठी एकूण 400 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. बीएमसीच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी सुमारे 4 हजार 728 कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे.

First published:

Tags: BMC, Coronavirus, Mumbai muncipal corporation