मुंबई, 4 डिसेंबर : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचा (Coronavirus new variant Omicron) भारतात शिरकाव झाला आहे. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने (BMC) पूर्व तयारी करत एक अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. बीएमसीकडून एक पाच सूत्री अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. हायरिस्क असलेल्या देशांतून येणाऱ्या नागरिकांवर या अॅक्शन प्लॅनमधून बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. पाहूयात कसा आहे हा अॅक्शन प्लॅन… (BMC strategy to prevent omicron) विमानतळ प्रशासन या अॅक्शन प्लॅनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. प्रशासनाकडून दररोज सकाळी 9 वाजता हायरिस्क देशांतून गेल्या 24 तासांत मुंबईत आलेल्या परदेशी नागरिकांची माहिती तयार करतील. त्यानंतर ही यादी मुंबई मनपाला सोपवतील. यासाठी एक खास ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. विमानतळ प्रशासन परदेशी प्रवाशांची यादी मुंबई महानगरपालिकेच्या आपात्कालीन कक्षाला पाठवणार आहे. वाचा : 5 वर्षांहून लहान मुलांना Omicron चा धोका? तज्ज्ञांनी व्यक्त केली ‘ही’ चिंता या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कुठल्याही नागरिकाचे नाव यादीतून सुटणार नाही. तसेच ज्या प्रवाशांनी परदेशातून मुंबईत प्रवेश केला आहे त्यांची माहिती आपात्कालीन कक्षाकडून मनपाच्या 24 वॉर्डना प्रवाशांच्या पत्त्यासह पाठवली जाणार आहे. वॉर रूममधून 7 दिवस परदेशी प्रवाशांशी संपर्क ठेवण्यात येणार आहे. यासोबतच विलगीकरण व्यवस्थित केलं जात आहे की नाही याबाबत माहिती घेतली जाणार आहे. दररोज सकाळी 10 वाजता या प्रवाशांची यादी प्राप्त झाल्यावर वॉर रूम सर्व प्रवाशांसोबत फोनवरुन संपर्क करतील. वॉर्ड निहाय महानगरपालिकेची पथकं बनणार, ही पथकं प्रवाशांच्या घरी जाऊनही तपासणी करणार आहे. प्रवासी राहत असलेल्या सोयाटीलाही पत्र पाठवलं जाणार आहे. तसेच विलगीकरणाचे नियम प्रवासी पाळत आहे की नाही यावर नजर ठेवण्यात येणार आहे. वाचा : ओमिक्रॉनची दहशत! प्रोफेसरने पत्नी अन् मुलांची केली हत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा राज्याच्या परदेशातून आले 3136 प्रवासी, 14 जण पॉझिटिव्ह कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन धडकला आहे. त्यामुळे राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली जात आहे. मुंबईत एकूण 3136 प्रवाशी आले असून 14 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवी व्हेरिएंट आढळून आल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. कर्नाटकमध्ये दोन रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. 2 डिसेंबरपर्यंत मुंबई विमानतळावरअतिसंवदेनशील असलेल्या देशातून 3136 प्रवाशी आले आहे. यापैकी 2149 जणांची आरपीटीसीआर चाचणी पूर्ण झाली आहे. यात 10 जण पॉझिटिव्ह आढळले आहे. तर 4 जण संपर्कात आल्यामुळे पॉझिटिव्ह आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.