लखनऊ 04 डिसेंबर : कानपूरमध्ये आपल्या पत्नी आणि मुलांची हत्या (Murder of Wife and Children's) करून फरार झालेल्या प्रोफेसरची धक्कादायक सुसाईड नोट (Shocking Suicide Note) हाती लागली आहे. यात प्रोफेसरने लिहिलं आहे की ओमिक्रॉन सर्वांना मारून टाकेल (Fear of Omicron Variant). आता मृतदेह नाही मोजायचे. शुक्रवारी संध्याकाळी पत्नी आणि मुलांची हत्या करून प्रोफेसरने आपल्या भावाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी घरातून पत्नी आणि दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. प्रोफेरसचा तपास अद्याप लागलेला नाही.
प्रोफेसर सुशील सिंह हे रामा मेडिरल कॉलेजच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख होते. डॉ. सुशील कुमार यांच्या घरी आढळलेल्या डायरीमध्ये त्यांनी बऱ्याचा गोष्टी लिहिल्या आहेत. यात लिहिलं आहे की, ओमिक्रॉन...कोरोना आता सर्वांना मारून टाकेल. आता मृतदेह नाही मोजायचे. माझ्या हलगर्जीपणामुळे सध्या अशा अडचणीत अडकलो आहे, ज्यातून बाहेर पडणं अशक्य आहे. माझं काहीच भविष्य नाही. अखेर मी पूर्ण विचार करून माझं कुटुंब संपवत आहे आणि स्वतःलाही संपवत आहे. याला इतर कोणीही जबाबदार नाही.
पुढे प्रोफेसरने लिहिलं, गंभीर आजाराने ग्रासलं आहे. पुढे काहीच भविष्य दिसत नाहीये. शेवटी याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नाही. मी माझ्या कुटुंबीयांना या त्रासात सोडून जाऊ शकत नाही. सर्वांना मुक्तीच्या मार्गावर सोडत आहे. सगळा त्रास एकाच क्षणात संपवत आहे. माझ्यानंतर मी कोणालाही त्रासात पाहू शकत नाही. अन्यथा माझा आत्मा मला कधीच माफ करणार नाही. अलविदा...डोळ्यांच्या गंभीर आजारामुळे हे पाऊल उचलत आहे. शिकवणं हे माझं काम आहे. आता डोळेच राहिले नाहीत तर मी करू..
कल्याणपूर क्षेत्रातील डिविनिटी अपार्टमेंटमध्ये पत्नी आणि दोन मुलांची हतोड्याने हत्या करत प्रोफेसर फरार झाला. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटांनी सुशील सिंहने आपला लहान भाऊ सुनिल सिंहला व्हॉट्सअप मेसेज केला. हा मेसेज पाहून सुनिल सिंहही हादरले. यात लिहिलं होतं. सुनिल पोलिसांना माहिती दे की मी डिप्रेशनमध्ये चंद्रप्रभा, शिखर आणि खुशीची हत्या केली आहे.
मेसेज पाहताच सुनिल अपार्टमेंटमध्ये गेले. इथे फ्लॅटला सेंट्रल लॉक लावलेलं होतं. गार्डच्या मदतीने दरवाजा तोडला असता आतमध्ये सर्व रक्ताच्या थारोळ्यात आढळले. डॉ. सुनिल यांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास आणि आरोपीचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Murder news, Suicide news