मुंबई, 03 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) महाराष्ट्राच्या (maharashtra) वेशीवर येऊन धडकला आहे. त्यामुळे राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली जात आहे. मुंबईत (mumbai airport) एकूण 3136 प्रवाशी आले असून 14 जण कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) असल्याचे आढळून आले आहे.
दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवी व्हेरिएंट आढळून आल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. कर्नाटकमध्ये दोन रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे.
महाराष्ट्र पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, नेपाळी गँगच्या नांग्या ठेचण्यात यश
2 डिसेंबरपर्यंत मुंबई विमानतळावरअतिसंवदेनशील असलेल्या देशातून 3136 प्रवाशी आले आहे. यापैकी 2149 जणांची आरपीटीसीआर चाचणी पूर्ण झाली आहे. .यात 10 जण पॉझिटिव्ह आढळले आहे. तर 4 जण संपर्कात आल्यामुळे पॉझिटिव्ह आले आहे.
पुजारा-रहाणे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार? टीम इंडियातून आली मोठी Update
या प्रवाशांमध्ये एक जण हा दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या प्रवासी पॉझिटिव्ह आढळला आहे. तर लंडन, पोर्तुगाल, जर्मनी, पॅरीस इतर देशातून आलेले प्रवासी पॉझिटिव्ह आढळले आहे. या सर्व प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर प्रवाशांचा सोध घेतला जात आहे.
ओमायक्रॉन पॉझिटिव्ह प्रवाशी हॉटेलमधून पळाला
दरम्यान, कर्नाटक (Karnataka) राज्यात दोन जणांना ओमाक्रोनची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्या दोघांपैकी एक ओमायक्रोन पॉझिटिव्ह (Omicron Positive) रुग्ण हॉटेलमधून पळून गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या घटनेमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे, विमानतळावर विदेशातून दाखल झालेल्यांपैकी 10 प्रवासी देखील पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्या प्रवाशांचा देखील शोध सुरू असल्याची माहिती कर्नाटकचे मंत्री आर अशोक यांनी दिली आहे. "कथित बेपत्ता झालेल्या त्या 10 नागरिकांचा आज रात्रीपर्यंत शोध लागायला हवा. त्यानंतर त्यांची टेस्ट केली जाईल", असं देखील मंत्री अशोक यांनी सांगितलं आहे. धक्कादायक म्हणजे, या दहा नागरिकांनी मोबाईल स्वीच ऑफ केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्याशी प्रशासनाचा संपर्क होऊ शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.