नवी दिल्ली, 4 डिसेंबर : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron variant of Coronavirus) दक्षिण आफ्रिकेत (South Africa) सर्वप्रथम आढळून आला. त्यानंतर आता हा ओमायक्रॉन सर्वत्र हळूहळू पसरत आहे. ओमायक्रोनने भारतात सुद्धा शिरकाव केला आहे. ओमायक्रॉनने चिंता वाढवलेली असतानाच आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, यावेळी 5 वर्षांहून कमी वयोगटातील मुलांमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वेगाने होत आहे. जरी मुलांना ओमायक्रॉनची लागण झाली नसली तरी मुलांमध्ये संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनचा व्हेरिएंट किती वेगाने पसरत आहे याचा अंदाज यावरुन वर्तवला जाऊ शकतो की, दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी एकूण 16,055 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळेला 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रति दिन 200 रुग्णांची नोंद होत होती. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी लहान मुलांबाबत चिंता व्यक्त केली आहे. वाचा : Omicron ला रोखण्यासाठी BMC चा अॅक्शन प्लॅन दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस (NICD)च्या डॉ. वासिला जसॅट (Dr. Waasila Jassat) यांनी सांगितले की, “मुलांना कोणत्याही विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. पूर्वीच्या साथीच्या रोगांमध्येही असेच दिसून आले आहे. परंतू तिसऱ्या लाटेत 5 वर्षांखालील मुले आणि 15 ते 19 वर्ष वयोगटातील तरुणांची रुग्णालयात दाखल होण्याची संख्या वाढली होती आणि आता चौथ्या लाटेत सर्व वयोगटांमध्ये, विशेषत: 5 वर्षांखालील मुलांमध्ये संसर्ग वाढण्याचा ट्रेंड दिसून आला आहे.” या संदर्भात आज तक ने वृत्त दिलं आहे. वाचा : ओमिक्रॉनची दहशत! प्रोफेसरने पत्नी अन् मुलांची केली हत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा यावेळी वेगळा ट्रेंड दिसतोय त्यांनी पुढे म्हटलं, “अपेक्षेप्रमाणे मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी आहे. परंतु 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये ते अधिक वेगाने वाढत आहे. 60 वर्षांवरील वृद्धांना या विषाणूची सर्वाधिक लागण होते आणि बाधितांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर 5 वर्षांखालील लहान मुलांची संख्या आहे. त्यामुळे यावेळी वेगळा ट्रेंड पहायला मिळत असल्याचंही ते म्हणाले.” NICD शी संबंधित डॉ. मिशेल ग्रोम (Dr. Michelle Groome) यांनीही हिंच चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, लहान मुलांध्ये संसर्ग झपाट्याने का पसरत आहे यावर संशोधन केले जाईल. याविषयी काहीही बोलणे घाईचे होईल. त्यांनी पुढे असेही सांगितले की, सरकारने मुलांसाठी रुग्णालयात बेड्स आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यावर भर द्यावा. वाचा : Omicron मुळे Booster dose घ्यायचा झाला तर तो कोणत्या Corona vaccine चा घ्यावा? गर्भवतींमध्येही वेगाने संसर्ग दक्षिण आफ्रिकेतील बाधितांपैकी 80 टक्क्यांहून अधिक हे गौतेंग प्रांतातील आहेत. येथील आरोग्य विभागाशी संबंधित डॉ. साकिसी मालुलेके (Dr. Ntsakisi Maluleke) यांनीही चिंता व्यक्तकेली आहे. त्यांनी सांगितले की, यावेळी तरुणांमध्ये तसेच गर्भवती महिलांमध्ये संसर्ग वेगाने पसरत आहे. अपेक्षा आहे की, येत्या काही आठवड्यांत या वयोगटात संसर्ग झपाट्याने पसरण्यामागचं कारण आम्हाला कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.