मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai Bank Election: आपण मजूर आहात का? सहकार विभागाची प्रविण दरेकरांना नोटीस

Mumbai Bank Election: आपण मजूर आहात का? सहकार विभागाची प्रविण दरेकरांना नोटीस

Mumbai Bank Election : मुंबै बँक निवडणूक प्रकरणी प्रविण दरेकरांना सहकार विभागाने नोटीस बजावली असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Mumbai Bank Election : मुंबै बँक निवडणूक प्रकरणी प्रविण दरेकरांना सहकार विभागाने नोटीस बजावली असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Mumbai Bank Election : मुंबै बँक निवडणूक प्रकरणी प्रविण दरेकरांना सहकार विभागाने नोटीस बजावली असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

मुंबई, 15 डिसेंबर : मुंबै बँक निवडणूक (Mumbai Bank election) प्रकरणी प्रविण दरेकरांना (Pravin Darekar) सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. आताही त्यांनी प्रतिज्ञा मंजूर संस्थेमार्फत मुंबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. मात्र दरेकर मजुर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. (Pravin Darekar gets notice from cooperation department)

या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. या नोटिशीत आपण मजूर आहात की नाही? अशी विचारणा दरेकर यांना करण्यात आली आहे. तसेच दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये असल्याचे दाखवले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना 2 लाख 50 हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे आपण प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचेही नोटिशीत नमुद करण्यात आले आहे.

मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. याबाबत प्रविण दरेकर यांना 21 डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात येऊन म्हणणे मांडण्याबाबत नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

वाचा : ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारला मोठा झटका, इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी SC ने फेटाळली

काय म्हटलं आहे नोटीसमध्ये ?

नोटीसमध्ये म्हटलं आहे, ज्टाअर्थी आपण महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर सदस्य म्हणून विवडून आला असून आफणास अंदाजीत रुपये 2.5 लाख (मानधन व भत्त्यासह) मासिक उत्पन्न प्राप्त होत असल्याचे दिसून येते. त्यावरुन प्रथमदर्शनी आपण मजूर असल्याचे दिसून येत नाही.

ज्याअर्थी मजूर सहकारी संस्थेच्या उपविधीमधील प्रकरण 2 नियम 9 मधील अटीनुसार, "मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारीरिक श्र्माचे कामे करमारी व्यक्ती असून जिचे उपजिविकेचे प्रमुख साधन मजूरीवर अवलंबून असेल तसेच तो शारीरिक श्रमातून मजूरी करणाला असला पाहिजे" अशी तरतूद असून आपण महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्नाचे साधन 'स्वतंत्र व्यवसाय' असे नमूद केले आहे

प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया

या नोटीस संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतते प्रविण दरेकर याना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, मला तशा पद्धतीची नोटीस आलेली नाहीये. संस्थेला आली असेल तर त्याचे उत्तर ते देतील.

First published:
top videos