आणीबाणीवरून राजकारण तापलं ! देशात ४ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, मनसेची टीका

आणीबाणीवरून राजकारण तापलं ! देशात ४ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, मनसेची टीका

आणीबाणीवरुन सुरु झालेल्या राजकीय धुमश्चक्रीत आता मनसेनं उडी मारली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जून : आणीबाणीवरुन सुरु झालेल्या राजकीय धुमश्चक्रीत आता मनसेनं उडी मारली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी 'स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेली आणीबाणी ही दोन वर्षांची होती पण गेली चार वर्षे आपण अघोषित आणीबाणी झेलतोय' असं ट्विट करत भाजपवर टीका केलीयं.

भारतीय पक्षाचे नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आणीबाणीवर टीका करताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना हिटलरशी केली होती. त्याचंच समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी काही ट्विट केले होते. आज मोदी याच विषयावर मुंबईत भाषण करणार आहेत. आणि त्यावरूनच देशपांडे यांनी आता भाजपवर टीका केली आहे.

गेल्या 4 वर्षापासून आम्ही आणीबाणी झेलतोय असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहित भाजपच्या कार्यकारणीवर आक्षेप घेतला आहे, असंच म्हणावं लागेल.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावून आज बरोबर 44 वर्षं पूर्ण झाली. यानिमित्तानं आणीबाणीत कसे हाल झाले, आणि लोकशाही किती महत्वाची आहे, या विषयावर पंतप्रधान मोदी भाषण करणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ही या कार्यक्रमाला उपस्थित असतील. दरम्यान आजचा  दिवस भाजपकडून देशभरात काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे.

 

हेही वाचा...

चिकन खाताय,सावधान!, कोंबड्यांना दिली जातात इंजेक्शन!

VIDEO : मौसम मस्ताना, छत्री उघडून बसमध्ये बसताना ?

VIDEO : बापरे!, एकाच घरात सापडली 100 कोब्राची पिल्लं !

सनी लिओनला लातुरात आणणाऱ्या अविनाश चव्हाणची गोळ्या झाडून हत्या

हत्तीचा बसवर हल्ला

 

First published: June 26, 2018, 9:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading