News18 Lokmat

VIDEO : मौसम मस्ताना, छत्री उघडून बसमध्ये बसताना ?

गळक्या बसेसची संख्याही जवळपास 20 गाड्या आहेत राव ! त्यामुळे विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्याना छत्री उघडून गाडीत बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2018 07:05 PM IST

VIDEO : मौसम मस्ताना, छत्री उघडून बसमध्ये बसताना ?

रत्नागिरी, 25 जून : यावा आमच्या कोकणात...असं कोकणी माणूस अभिमानाने सांगतो...पण तुम्ही कोकणात फिरण्यासाठी जर लालपरीने प्रवास करणार असाल तर कृपया एक छत्री नक्की बाळगा...त्याचं कारण असं की, इथं गळक्या एसटी बसेस धावत असतात...

गरीबांचा सारथी म्हणून नावलौकीक असलेल्या लाल परी अर्थात एसटी बसचा प्रवास आता चांगलाच महागला. बरं प्रवास महागला असला तरी सोईसुविधांच्या नावाने बोंबाबोब असल्याचं समोर आलंय. ग्रामीण भागातल्या जनतेला गळक्या एसटी बसेसमुळे चक्क बसमध्ये छत्र्या घेउन प्रवास करावा लागतोय.

रत्नागिरीतल्या लांजा डेपोतून दररोज सुटणाऱ्या एसटी बसेसचे हे दृष्य पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय लागणार नाही. एसटी बस गळत असल्यामुळे गावकऱ्यांना बसच्या आत छत्री उघडून बसावे लागते. बरं हे काही एकाच खुर्चीवर होत नाही तर ठिकठिकाणी बसमध्ये असंच छत्री उघडून बसावे लागते.

क्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं !

बरं एवढंच नाहीतर या एसटी बसेसला कुठे तर खिडक्याच नाहीये. ही बस लांजा-झर्ये, लांजा-रत्नागिरी या मार्गावर धावते.

Loading...

गळक्या बसेसची संख्याही जवळपास 20 गाड्या आहेत राव ! त्यामुळे विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्याना छत्री उघडून गाडीत बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

आणीबाणी : अरूण जेटलींनी केली इंदिरा गांधी आणि हिटलरची तुलना

रावते साहेब, शिवशाही सुरू केलीत कौतुकच आहे हो ! पण जरा ग्रामीण भागात धावणारी एसटी गळकी आहे. तीची गळती कधी काढणार ? असा सवाल प्रवाशी विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2018 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...