चिकन खाताय,सावधान!, कोंबड्यांना दिली जातात इंजेक्शन!

चिकन खाताय,सावधान!, कोंबड्यांना दिली जातात इंजेक्शन!

मनसोक्त चिकन झोडणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी...

  • Share this:

मुंबई, 25 जून : मनसोक्त चिकन झोडणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी....चिकनसाठी वापरल्या जाणाऱ्या कोंबड्यांचं वजन वाढवण्यासाठी कोंबड्यांना अवैधरित्या अँण्टीबायोटिक्स देत असल्याची धक्कादायक माहिती मुंबई हायकोर्टातील एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पुढे आली आहे.

सध्या दुधासहीत सर्वच खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आढळून येत असल्याने सिटीझन सर्व्हिस फॉर सोशल वेलफेअर अँण्ड एज्युकेशन या सेवाभावी संस्थेतर्फे मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली आहे. त्याच्या सुनावणी दरम्यान ही बाबसमोर आली आहे. याचिकाकर्त्यांनी ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

अशाप्रकारे इंजेक्शन दिलेल्या चिकनच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत. जनावरांसाठीच्या कुठल्याही औषधासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असतानाही बाजारात सर्रासपणे ही औषधे विकली जात असल्याची बाबसमोर येताच मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची चांगलीच पिसं काढली.

हा प्रकार गंभीर असून सरकारला याचे काहीच सोयरसुतक नाही का अशा शब्दात शासनाला हायकोर्टाने खडसावलंय. एवढंच नाही तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय यापुढे अशा औषधांची विक्री केली जाऊ नये यासाठी सरकारला खबरदारी घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत.या सगळ्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत हायकोर्टानं राज्य सरकारला धारेवर धरत याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत.

First published: June 25, 2018, 9:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading