VIDEO : बापरे!, एकाच घरात सापडली 100 कोब्राची पिल्लं !

VIDEO : बापरे!, एकाच घरात सापडली 100 कोब्राची पिल्लं !

  • Share this:

25 जून, ओरिसा: सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी बऱ्याच जणांच्या उरात धडकी भरल्याशिवाय राहत नाही आणि साप जर कोब्रा असेल तर काय कथा सांगावी. तर मग कल्पना करा, एकाच घरात 100 हून अधिक कोब्राची पिल्ले मिळाली तर काय होइल? होय, हे खरं आहे.

ओरिसातील भद्रक जिल्ह्याच्या श्यामपुर गावात बिजय भुयान यांच्या घरात ही पिले सापडली आहेत. भुयानची मुलीने शुक्रवारी एका सापाला मारून टाकलं होतं. ज्यानंतर ज्यानंतर सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना कोब्राच्या 20 पिलांना वाचवण्यात यश आलं.

क्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं !

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, सर्पमित्रांनी शनिवारी घरात तपासणी केली आणि त्यांना तब्बल 106 साप मिळाले. बातमी मिळताच गावातील लोक साप पाहण्यासाठी गर्दी करू लागले.

First published: June 25, 2018, 11:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading