Home /News /maharashtra /

दोन लहान मुली झाडाखाली खेळत होत्या, पिसाळलेल्या लांडग्याने घेतली झेप, आणि...

दोन लहान मुली झाडाखाली खेळत होत्या, पिसाळलेल्या लांडग्याने घेतली झेप, आणि...

शेतातून पळ काढल्यानंतर हा लांडग्याने थेट गावात शिरकाव केला आणि समोर येईल त्याच्यावर हल्ला केला.

बुलडाणा, 07 जून : शेतामध्ये काम करीत असताना झाडाखाली खेळत असलेल्या लहान मुलीवर पिसाळलेल्या लांडग्याने अचानक हल्ला केला तिला वाचवण्यासाठी आलेल्या काकासह इतर परिसरातील शेतकऱ्यांवर सुद्धा या लांडग्याने हल्ला  करून जखमी केले. या घटनेत 3 लहान मुलांसह 9 जण जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बुलडाणा जिह्यातील खामगाव तालुक्यातील शिराळा शिवारात काही शेतकरी शेतामध्ये काम करीत होते. त्यावेळी अचानकपणे पिसाळलेल्या लांडग्याने रमेश लठाळ यांच्यावर हल्ला करून जखमी केले. तिथून बाजूला असलेल्या शेतात शेतकरी संजय साळुंखे यांची पुतणी आणि नात पावसात झाडाखाली खेळत होती. या दोघी लहान मुली खेळत असताना पिसाळलेल्या लांडग्याने या दोघींवर हल्ला केला व जखमी केलं, ही बाब संजय साळुंखे यांना दिसताच त्यानी आरडाओरडा करून परिसरातील शेतकऱ्यांसह त्या मुलींना वाचविण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा-हत्तीच्या हत्येमुळे देश हादरला, औरंगाबादमधून आली कुत्र्याची संतापजनक घटना समोर यावेळी या लांडग्याने इतर शेतकऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आणि तेथून पळ काढला. शेतातून पळ काढल्यानंतर हा लांडग्याने थेट गावात शिरकाव केला. त्यानंतर गावात असलेल्या गावकऱ्यांवर हल्ला करून जखमी केले व तेथून जंगलामध्ये पळ काढला. यामध्ये श्रीकृष्ण पंखुले, दिनकर हटकर, आकाश हटकर, आचल साळुंखे,लक्ष्मी शिंदे, भाग्यश्री मावळे, विशाल शिंदे,रोशनी शिंदे हे जखमी झाले आहेत. याच बरोबर या पिसाळलेल्या लांडग्याने कुंदन कोकरे यांच्या 3 गाई आणि दोन म्हशी यासह विजय कारंडे याचा 2 म्हशींना जखमी केले आहे. सर्व जखमी  नागरिकांना सामान्य रुग्णालय खामगाव येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: बुलडाणा, लांडगा

पुढील बातम्या