मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अमित ठाकरे झाले आक्रमक, आधी अजित पवारांना पत्र; आता राज्यपालांची भेट!

अमित ठाकरे झाले आक्रमक, आधी अजित पवारांना पत्र; आता राज्यपालांची भेट!

विशेष म्हणजे, कोरोनाचं संकट सुरू झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहे, असं प्रशस्तीपत्रक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं होतं.

विशेष म्हणजे, कोरोनाचं संकट सुरू झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहे, असं प्रशस्तीपत्रक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं होतं.

विशेष म्हणजे, कोरोनाचं संकट सुरू झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहे, असं प्रशस्तीपत्रक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं होतं.

मुंबई, 22 जून : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे राजकारणात सक्रीय झाले आहे. अमित ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नावर ते भूमिका मांडत आहे. आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या मानधनाच्या मुद्द्यावर अमित ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, त्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिले होते. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज दुपारी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि  उपाय योजना बाबत उदासीनता विषयांवर चर्चा केली. तसंच आशा स्वयंसेविकांना सोयी सुविधा मिळाव्यात, राज्य सरकारने त्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी अमित ठाकरे यांनी निवदेनातून राज्यपालांकडे केली. राज्यातील  एम डी आणि एम एस पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थी सध्या कोरोनाच्या उपचारासाठी शासकीय वैद्यकीय सेवेत आहेत. असं असताना त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळाला नाही, अशा परिस्थिती त्यांना परीक्षासाठी वेळ मिळावा अशी मागणी यावेळी राज्यपाल यांना केली. 10वी, 12 वीच्या निकाल आणखी लांबणार? 'या' तारखांना लागण्याची शक्यता विशेष म्हणजे, कोरोनाचं संकट सुरू झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहे, असं प्रशस्तीपत्रक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं होतं. पण, आता त्यांचाच मुलगा आणि पक्षाचा नेता अमित ठाकरे यांनी मात्र आशा सेविकांसाठी मानधन वाढवून मिळावं यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना अमित यांनी पत्र लिहिलं खरं. पण इतर नेत्यांप्रमाणेच कोणत्याही मंत्र्यांच्या भेटीपेक्षा राज्यपाल भेटीसाठी राजभवनच गाठलं अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. सुरुवातीला राज्य सरकारवर विश्वासठेवणाऱ्या मनसेचा आता भरोसा राहिला नाही की काय असा प्रश्न आता विचारला जात आहे. दोन दिवसांपूर्वी आशा स्वयंसेविकांनी कृष्णकुंजवर जाऊन अमित ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी अजित पवार आणि राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. सामनाच्या अग्रलेखामुळे नितेश राणे भडकले, 'ते' पत्र छापण्याचा दिला सेनेला इशारा या पत्रात अमित ठाकरे म्हणाले की, ''परवा काही 'आशा' स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त 1600 रुपये मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र 'आशां'ना दर महिन्याला 4000 ते 10000 रुपये इतका मोबदला मिळत आहे.' 'आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका 'आरोग्य सैनिक' बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे. त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून द्यावा', अशी मागणी अमित ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: Ajit pawar, MNS

पुढील बातम्या