सामनाच्या अग्रलेखामुळे नितेश राणे भडकले, 'ते' पत्र छापण्याचा दिला सेनेला इशारा

सामनाच्या अग्रलेखामुळे नितेश राणे भडकले, 'ते' पत्र छापण्याचा दिला सेनेला इशारा

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांची इतकी चिंता पण ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारायचं पण नाही.

  • Share this:

मुंबई, 22 जून : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. त्याचबरोबर नारायण राणे यांचा उल्लेख न करता जोरदार टोला लगावला होता. सेनेच्या या भूमिकेवरून आता आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना थेट इशाराच दिला आहे.

नितेश राणे यांनी एकापाठोपाठ ट्वीट करून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.  'सामनाचं आमच्यावर प्रेम आहे. असणारच..का नाही असणार शेवटी Old is gold! पण, काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता पण ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारायचं पण नाही. काही "पत्र" माझ्याकडे आहेत. तळकोकणच्या प्रहारमधून लवकरच छापतो. मग बघू कशी कुरकुर होते, असा थेट इशाराच नितेश राणे यांनी सेनेला दिला आहे.

तसंच, 'सामना'च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत. पवारांना भेटले की फडणवीसांबद्दल उलट बोलायचं. राणेंना भेटले की उद्धव ठाकरेंबद्दल उलट बोलायचं. राज्यपाल भेटले की पवारांबद्दल उलट बोलायचं, असं करून स्वतःची किंमत संपवली,  ना भावाला मंत्री,ना स्वतः संपादक, असा टोला नितेश राणे यांनी राऊतांना लगावला.

भाजपमध्ये डॅमेज कंट्रोल सुरू, येत्या 15 दिवसांत या नावांना मिळणार मोठी जबाबदारी

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून  राधाकृष्ण पाटील यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावर विखे पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली होती तसंच उद्धव ठाकरे यांच्या कारभाराविरुद्ध ही टीका केल्यानंतर सामानातून विखेंना उत्तर दिले आहे. यावेळी नारायण राणे आणि त्यांच्या मुलांचे नाव न घेता टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

काय लिहिलं होतं सामनात?

'राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. निदान स्वतः फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्‍या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत.

मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणार्‍यांना महाराष्ट्र माफ करीत नाही हे त्या प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले' अशी टीका विखे पाटील आणि नारायण राणे यांच्यावरही करण्यात आली होती.

संपादन - सचिन साळवे

First published: June 22, 2020, 12:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या