मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra SSC & HSC Results 2020 : 10वी, 12 वीच्या निकाल आणखी लांबणार? 'या' तारखांना लागण्याची शक्यता

Maharashtra SSC & HSC Results 2020 : 10वी, 12 वीच्या निकाल आणखी लांबणार? 'या' तारखांना लागण्याची शक्यता

कोरोनामुळे पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता. परिणामी आता निकालासाठी आणखीन वाट पाहावी लागणार असल्याचं दिसत आहे.

कोरोनामुळे पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता. परिणामी आता निकालासाठी आणखीन वाट पाहावी लागणार असल्याचं दिसत आहे.

कोरोनामुळे पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता. परिणामी आता निकालासाठी आणखीन वाट पाहावी लागणार असल्याचं दिसत आहे.

मुंबई, 22 जून : कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. आता सगळ्यांना काळजी लागलीय ती शाळा आणि कॉलेजेसची त्याच बरोबर 10वी आणि 12वीच्या निकालांची. कोरोनामुळे पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता. परिणामी आता निकालासाठी आणखीन वाट पाहावी लागणार असल्याचं दिसत आहे. याआधी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचं संकेत दिले होते. यानुसार आता ही तारीख 27 ते 28 जुलै असण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरूच आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्ध्यांचे नुकसान होई नये यासाठी, राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी ई-शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतलांय. आणि ज्या विद्यार्थ्यांना ई-शिक्षण घेण्यास अडचणी आहेत अशा विद्यार्थ्यांना दूरदर्शन आणि रेडियोच्या माध्यमातूनही शिक्षण देण्यासाठी सुरवात करत असल्याची माहीती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. वाचा-...आणि मुलींमध्ये राज्यात प्रथम येऊनही उपजिल्हाधिकारी पर्वणी पाटील झाल्या ट्रोल महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली आहे. 12वीची परिक्षा पूर्ण झाली होती. मात्र 10वीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. नंतर तो रद्दच करण्यात आला होता. सरकारसमोर पेपर तपासण्याचंही मोठं आव्हान होतं. मात्र आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून शेवटच्या टप्प्यात काम आहे. वाचा-मटका व्यावसायिकाचा मुलगा बनला नायब तहसीलदार, मृत वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण!
असे पाहा निकाल निकालासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा. या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाका. तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता. mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येतील. वाचा-कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, MPSC परीक्षेत झळकला दुसऱ्या क्रमांकावर संपादन-प्रियांका गावडे.
First published:

Tags: HSC, HSC Result, Ssc board, Ssc exam result

पुढील बातम्या