नरेंद्रभाई, आपको एक मेरी सलाह, असं म्हणत कवी मनाच्या नेत्यानं लिहिलं पत्र

नरेंद्रभाई, आपको एक मेरी सलाह, असं म्हणत कवी मनाच्या नेत्यानं लिहिलं पत्र

कोरोनावर लस येत नाही किंवा कोरोनाची साखळी तुटत नाही, तोपर्यंत यंदाच्या वर्षी सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवाव्यात.

  • Share this:

मुंबई, 16 मे: प्रिय नरेंद्रभाई, आपको एक मेरी सलाह, असं म्हणत मराठी बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेले कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे अभिजित बिचकुले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने 2020–21या शैक्षणिक वर्षात शाळा, महाविद्यालय बंद ठेवावी, अशी विनंतीही अभिजित बिचुकले यांनी केली आहे.

हेही वाचा..पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युदरात घट

कोरोना व्हायरसमुळे जगभरात कहर केला आहे. कोरोनावर लस येत नाही किंवा कोरोनाची साखळी तुटत नाही, तोपर्यंत यंदाच्या वर्षी सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवाव्यात. पंतप्रधानांनी सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्याबाबतचे आदेश द्यावे, असं पत्रात अभिजित बिचुकले यांनी म्हटलं आहे. देशातील अनेक राज्यात इयत्ता नववीपर्यंत श्रेणी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे वर्षभर शाळा बंद ठेवल्या तरी काही फरक पडणार नाही.

15 वर्षांखालील मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शाळा सुरू झाल्या तर मुले खेळण्याच्या नादात सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाहीत, त्यामुळेही मोठा धोका निर्माण होई शकतो, असं बिचुकले यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा...कर्तव्यासोबतच माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या पोलिसाला गृहमंत्र्यांचाही 'कडक सॅल्युट'

अभिजित बिचकुले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, तर विधानसभा निवडणूक 2019 ला अभिजित बिचकुले यांनी विद्यमान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. एवढंच नाही तर पराभवानंतर सत्तास्थापनेची संधी द्या, अशी मागणी अभिजित बिचुकले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती.

First published: May 16, 2020, 3:51 PM IST

ताज्या बातम्या