पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युदरात घट

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युदरात घट

पुण्यातील कोरोनाबाधितांचा मृत्युदर सुरुवातीला देशात, राज्यात सर्वाधिक होता.

  • Share this:

पुणे, 16 मे: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. राज्यातच काय तर देशात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्या खालोखाल पुण्यात आहेत. पुण्यातही कोरोना रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 3600 वर पोहोचला आहे. अशा स्थितीत पुण्यातून एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. पुण्यात कोरोनाबाधितांच्या मृत्युदरात घट आढळून आली आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांचा मृत्युदर सुरुवातीला देशात, राज्यात सर्वाधिक होता. आता त्यात घट आली आहे. 31 मेच्या आधीच्या अंदाजानुसार कोरोनाबाधित रुग्णांची 9600 इतकी होईल, असं वाटलं होतं. मात्र हा आकडा 4000 च्या आत आहे. रिकव्हरी रेट ही वाढला आहे. ही पुणेकरांसाठी आनंदाची घटना आहे. तथापि प्रतिबंधित क्षेत्रात रुग्ण वाढत आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात 3 टक्के प्रतिबंधित क्षेत्रातील आणखी काही भाग वगळला जाईल. तसेच उर्वरित क्षेत्रात आणखी दुकाने सुरू केले जातील, असं सांगितलं जात आहे.

हेही वाचा.. धक्कादायक! संपर्क साधूनही आली नाही अ‍ॅम्ब्युलन्स, पुण्यात एकाचा रस्त्यावर मृत्यू

प्रतिबंधित क्षेत्रात ही जीवनावश्यक सुविधांशिवाय आणखी काय सुरू करता येईल, याचा विचार सुरु असल्याचं पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं आहे.

पुण्यातील खासगी कार्यालये, सरकारी कार्यालये आणि व्यापारी आस्थापने जी सध्या बंद आहेत, ती चौथ्या टप्प्यात सुरू करता येतील का? याची चाचपणी सुरू असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. स्मार्ट सिटी कोविड सेंटरमध्ये आढावा घेतल्यानंतर आयुक्त बोलत होते.

दरम्यान, पिंपरी चिंचवड भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नव्हती. यामधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आल्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आदेशित केले आहे.

हेही वाचा.. पुण्यात कोरोनाच्या धास्तीने 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या, नंतर रिपोर्ट आला निगेटिव्ह

राज्यातील कोव्हिड 19 चा प्रभाव असलेले कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील उद्योग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. कोव्हिड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत – रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत. पहिला मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महापालिका हा एक भाग आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित भाग. पुणे महानगर प्रदेश मधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

First published: May 16, 2020, 2:50 PM IST

ताज्या बातम्या