कर्तव्यासोबतच माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला गृहमंत्र्यांचाही 'कडक सॅल्युट'

कर्तव्यासोबतच माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला गृहमंत्र्यांचाही 'कडक सॅल्युट'

पोलिस कॉन्स्टेबलची कर्तव्यासोबतच माणुसकी पाहून राज्याचे गृहमंत्रीही भारावले.

  • Share this:

मुंबई, 16 मे: विरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचं हृदयविकारानं निधन झालं. त्याचे आई-वडील आणि सर्व नातेवाईक परप्रातांत. लॉकडाऊनमुळे ते येऊ शकत नव्हते, आता करायचं काय? असा प्रश्न पोलिस प्रशासनाला पडला होता. अखेर पोलिस नाईक सुभाष शिंदे यांनी पुढाकार घेत मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून तरुणाच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडले.

हेही वाचा.. धक्कादायक! संपर्क साधूनही आली नाही अ‍ॅम्ब्युलन्स, पुण्यात एकाचा रस्त्यावर मृत्यू

एवढेच नाही तर व्हिडीओ कॉल करून आई-वडिलांना आपल्या मुलाचं अंत्यदर्शन घडवलं होतं. पोलिस कॉन्स्टेबलची कर्तव्यासोबतच माणुसकी पाहून राज्याचे गृहमंत्रीही भारावले. या संवेदनशिल कार्याची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस नाईक सुभाष शिंदे यांची प्रशंसा केली आहे.

दरम्यान, विरार पूर्वेकडील फुलपाडा येथे प्रमोद खारे (वय 45) यांचं गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांचा एकही नातेवाईक येऊ न शकत नसल्याचं स्पष्ट झालं. पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी स्वतः प्रमोद खारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करून अंत्यदर्शन घडवलं.

प्रमोद खारे हे मुंबईत एकटेच राहात होते. त्यांचे नातेवाईक कोलकाता आणि दिल्लीत राहतात. लॉकडाऊनमुळे नातेवाईकांना येण्यासाठी एक दिवस प्रेत राखून ठेवलं मात्र, त्यांना येता आलं नाही. नातेवाईकांनी पोलिस सुभाष शिंदे यांना अंत्यसंस्कार करण्यास विनंती केली.

हेही वाचा...लॉकडाऊनमध्ये 900 किलोमीटर जखमी मुलाला खांद्यावरून घरी घेऊन गेले वडील VIDEO

नातेवाईकांनी अखेरचं दर्शन व्हिडीओ कॉलद्वारेच घेऊन साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. अशा या योद्ध्याच्या कार्याची सगळीकडे प्रसंसा केली जात आहे. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही सुभाष शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला आहे. गृहमंत्र्यांनी स्वत: सुभाष शिंदे यांना फोन करुन त्यांचे अभिनंदन केलं. अशाच प्रकारच समाजोपयोगी कार्य पुढेही घडो, अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.

First published: May 16, 2020, 1:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या