Home /News /mumbai /

मोठी बातमी, अजित पवारांचा संभाजीराजेंना फोन, बैठकीचे दिले निमंत्रण

मोठी बातमी, अजित पवारांचा संभाजीराजेंना फोन, बैठकीचे दिले निमंत्रण

सारथी संस्थेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी उद्या गुरुवारी मुंबई बैठक आयोजित करण्यात आली आहे .

मुंबई, 08 जुलै :  पुण्यातील सारथी संस्थेवरून वाद पेटला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे   खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली आहे. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संभाजीराजेंना फोन केला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. बैठकीत सारथी संस्थेच्या वादावर चर्चा झाली. सारथी संस्थेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी उद्या गुरुवारी मुंबई बैठक आयोजित करण्यात आली आहे . राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना फोन करून उद्या होणाऱ्या या बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले आहे. पोलिसांना चकवा देत गँगस्टर विकास दुबे फरार, दिल्लीत जाण्यामागे 'हे' आहे कारण या मागण्या उद्याच्या बैठकीत मांडण्यात येणार 1)सारथी ही 'स्वायत्त' संस्था म्हणून टिकली पाहिजे. स्वायत्तते बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. 2) जे अध्यादेश राज्यपाल शासन असताना गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याने काढले ते सर्व रद्द केले पाहिजेत. 3) शासनाने कथित गैरव्यवहाराची चौकशी केली, तिच्या मध्ये काही तथ्ये आढळली का? किती रुपयांचा घोटाळा झाला? हे शासनाने जाहीर करावे. झालेला सर्व जमाखर्च हा ऑनलाईन करावा, अन्यथा सारथी ची जाणीव पूर्वक बदनामी केली म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. 4) तारदूत प्रकल्प हा समाजोपयोगी असून तो बंद करण्यात येऊ नये. उलट त्याची व्याप्ती वाढवण्यात यावी. 5) ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली नाही ती लवकरात लवकर देण्यात यावी. 6) शासनाने नवीन कोण कोणत्या योजना कल्पिल्या आहेत, त्या जाहीर करण्यात याव्यात. दरम्यान, सारथी संस्थेच्या वादात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी 'मी ओबीसी असल्यामुळेच मराठा क्रांती मोर्चा माझा विरोध करतं आहे, जर असे राजकारण होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडून पदभार काढून घ्यावा' असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर संभाजीराजे यांनी नापसंती व्यक्त केली होती. 'मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अश्या पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही' असं परखड मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं होतं. कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्या, राजीव गांधी फाउंडेशनसह तीन ट्रस्टची होणार चौकशी तसंच, 'शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही, असं म्हणत वडेट्टीवार यांना टोला लगावला होता. दरम्यान, 'सारथी संस्थेला निधी द्या, माझ्या कामाबद्दल शंका असेल तर मला संस्थाचा कारभार नको' अशी उद्विग्नता  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. ही भावना आपण मंत्रिमंडळ बैठकीत मांडू अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून  विजय वेडट्टीवार यांच्या भूमिकेडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ajit pawar, संभाजी राजे

पुढील बातम्या