कानपूर, 08 जुलै: गँगस्टर विकास दुबेच्या राइट हॅण्ड असलेल्या अमर दुबेचा बुधवारी सकाळी कानपूर पोलिसांनी एन्काउंटर केला. पोलिसांकडून विकास दुबेला शोधण्याची मोहीम सुरू आहे. पोलिसांकडून विकास दुबेविरोधात कारवाई सुरू आहे. विकास दुबेची माहिती देणाऱ्याला इनामही देणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान कानपूर पोलिसांच्या टीमला चकवा देऊन विकास दुबे दिल्लीच्या दिशेनं फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. गँगस्टर विकास दुबे एन्काउंटरच्या भीतीनं फरार झाला आहे. उत्तर प्रदेशातील न्यायालयात अथवा पोलीस ठाण्यास सरेंडर केल्यानंतर खटला चालणार नाही एन्काउंटरमध्ये मारले जाऊ ही भीती विकास दुबेला असल्यानं तो फरार झाला आहे. विकास दुबे दिल्ली पोलिसांकडे स्वत:ला सरेंडर करू शकतो असाही कयास लावला जात आहे. हे वाचा- कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्या, राजीव गांधी फाउंडेशनसह तीन ट्रस्टची होणार चौकशी दुसऱ्या राज्यात विकास दुबेनं सरेंडर केल्यानंतर तिथे कोर्टाची प्रक्रिया सुरू होईल. थेट एन्काउंटरचा निर्णय होणार नाही याची माहिती विकास दुबेला असल्यानं त्यानं पोलिसांना चकवा देऊन फरार झाला आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमलं आहे. दिल्ली पोलिसांनाही या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. अमर दुबे चकमकीत विकास दुबेचा खास गुंड ठार झाला. स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) च्या पथकाने हमीरपूर येथे चकमकीत अमरला ठार केले. कानपूर गोळीबारानंतर तो फरार होता. कारवाई करण्यासाठी आलेल्या कानपूर पोलिसांवर विकस दुबेसह साथीदारांनी हल्ला केला होता. त्यामध्ये 8 पोलीस शहीद झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







