नवी दिल्ली, 08 जुलै : गृह मंत्रालयानं कॉंग्रेसच्या अडचणी वाढवल्या आहेत. गृह मंत्रालयानं कॉंग्रेस आणि गांधी परिवाराच्या राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तिघांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. राजीव गांधी फाउंडेशनवर झालेल्या आरोपानंतर पीएमएलए, आयकर कायदा आणि एफसीआरएच्या विविध कायदेशीर तरतुदींच्या उल्लंघनाची चौकशी केली जाणार आहे. यासाठी एक आंतर-मंत्री समिती तयार करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या या निर्णयानंतर कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांची अडचण वाढू शकतात. अलीकडेच कॉंग्रेस पक्षाशी संबंधित अनेक ज्येष्ठ नेत्यांवर चीन संबंधित फंडिंग कनेक्शनवर बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर हे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या तिन्ही ट्रस्टची चौकशी ही PMLA, FCRA, आयकराबाबत असेल. असे सांगितले जात आहे की अंमलबजावणी संचालनालयाचे विशेष संचालक पातळीवरील अधिकारी या चौकशी समितीचे प्रमुख असतील. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केला होता आरोप काही दिवसांपूर्वी वर्च्युअल रॅली दरम्यान भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि कॉंग्रेसवर आरोपही केले होती. नड्डा यांनी केलेल्या आरोपात, ‘मला आश्चर्य वाटले की 2005-06मध्ये राजीव गांधी फाउंडेशनला चीनी दूतावास आणि चीनकडून देणगी म्हणून 2 लाख डॉलर मिळाले. हे कॉंग्रेस आणि चीनमधील एक गुप्त संबंध आहे. 1991मध्ये झाली होती राजीव गांधी फाउंडेशनला सुरुवात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावानं 21 जून 1991मध्ये या फाउंडेशनची सुरुवात झाली. राजीव गांधी फाउंडेशनच्या वेबसाइटनुसार 1991 ते 2009 या काळात फाउंडेशनने समाजातील विविध क्षेत्रात काम केले. 2010 मध्ये राजीव गांधी फाउंडेशनने शिक्षण क्षेत्रावर विशेष काम करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, प्राध्यापक एम एस स्वामीनाथन, डॉ. अशोक गांगुली, माँटेकसिंग अहलुवालिया, सुमन दुबे, राहुल गांधी, डॉ शेखर रहा, संजीव गोएंका आणि प्रियंका गांधी वड्रा फाउंडेशनचे सदस्य आहेत.

)







