जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'शिवसैनिकाला' मुख्यमंत्री करण्याबाबत राऊतांनी दिलं उत्तर, फडणवीसांना विचारला सवाल

'शिवसैनिकाला' मुख्यमंत्री करण्याबाबत राऊतांनी दिलं उत्तर, फडणवीसांना विचारला सवाल

'शिवसैनिकाला' मुख्यमंत्री करण्याबाबत राऊतांनी दिलं उत्तर, फडणवीसांना विचारला सवाल

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या रूपाने सामान्य शिवसैनिकाला भाजपाने मुख्यमंत्री केलं असं मानलं जात आहे, त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 जुलै : भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची आज (शुक्रवार) ईडीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीला हजर राहण्यापूर्वी राऊत पत्रकारांशी बोलत होते. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ईडीच्या कार्यलयाबाहेर येऊ नका, असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं. ईडीचा वापर राजकीय सोयीसाठी होत असल्याचा आरोप करत तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नव्या सरकारला शुभेच्छा एकनाथ शिंदे यांच्या सरकारला राऊत यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. नव्या सरकारनं सुखाचा संसार करावा, त्यांना आमच्या शुभेच्छा. आम्ही सत्तेत असताना विरोधकांनी अडथळे निर्माण केले आम्ही तसं करणार नाही, असं राऊत यावेळी म्हणाले.शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं मी म्हणाणार नाही. शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचं होतं तर सध्य भाजपाचे खासदार असलेल्या नारायण राणेंना मुख्यमंत्री का केलं नाही? असा सवाल त्यांनी विचारला. शिवसेना फोडण्याचा भाजपाचा प्लॅन पूर्ण झाला. शिवसेनेच्या एका गटाच्या नेत्याला भाजपाने मुख्यमंत्री केलं. शिवैनिकाला मुख्यमंत्री केलं असं मी म्हणणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केले. संजय राऊतांची आजपासून खरी कसोटी ईडीला सामोरे जाणार, किरीट सोमय्यांनी डिवचले देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी मोठं मन दाखवलं असतं तर युती टिकली असती. ते मुख्यमंत्री झाले असते, असेही राऊत यांनी सांगितले. फडणवीस यांनी पक्षाचा आदेश स्विकारत उपमुख्यमंत्रिपद स्विकारले आहे. आता फडणवीस शिंदेंचे राईट हँड झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात