जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sanjay Raut ED Summons : संजय राऊतांची आजपासून खरी कसोटी ईडीला सामोरे जाणार, किरीट सोमय्यांनी डिवचले

Sanjay Raut ED Summons : संजय राऊतांची आजपासून खरी कसोटी ईडीला सामोरे जाणार, किरीट सोमय्यांनी डिवचले

Sanjay Raut ED Summons : संजय राऊतांची आजपासून खरी कसोटी ईडीला सामोरे जाणार, किरीट सोमय्यांनी डिवचले

संजय राऊत (sanjay raut) यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी (Patrachal land scam case) ईडीने मागच्या दोन दिवसापूर्वी समन्स बजावले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 जुलै : संजय राऊत (sanjay raut) यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी (Patrachal land scam case) ईडीने मागच्या दोन दिवसापूर्वी समन्स बजावले होते. (ED summons sanjay raut) यानंतर राऊत यांनी ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला होता. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, मला आताचा समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक (shiv sena) मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्वीकारणार नाही. या, मला अटक करा! जय महाराष्ट्र! असे सांगितले होते दरम्यान आज संजय राऊत (sanjay raut) 12 वाजता ईडीला सामोरे जाणार आहेत.

जाहिरात

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक ट्विट केले आहे. मी आज १२ वाजता ईडीसमोर हजर होणार असल्याचे म्हटले आहे. हे ट्विट त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, मा बॅनर्जी, राहुल गांधी यांना टॅग केले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयासमोर जमू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.  

हे ही वाचा :  ठाकरेंना धक्का! मेट्रो कारशेड आरेतच; फडणवीसांचा पहिला आदेश

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना २७ जूनला समन्स बजावले होते, पण संजय राऊत नियोजित दौऱ्यामुळे ईडीसमोर चौकशीला हजर राहू शकले नाहीत. त्यांच्यावतीने त्यांचे वकील उपस्थित राहून त्यांनी विनंती अर्ज सादर केला. १४ दिवसांनी कागदपत्रांसह हजर होण्याची विनंती ईडीनं स्वीकारली.

आज सकाळी सकाळी ट्विट करत संजय राऊत यांनी सांगितले आहे की, " मी आज दुपारी 12 वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे." त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना आवाहनही केले आहे की, कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयात जमू नये.

जाहिरात

हे ही वाचा :  Mumbai Monsoon Rain : मुंबईकरांनो सावधान पुढचे 5 दिवस red alert, जनजीवन, रेल्वे सेवा विस्कळीत

संजय राऊत यांना ई डी ED कडे हिशोब तर द्यावा च लागणार

संजय राऊत ईडी कार्यालयात आज 12 वाजता हजर राहणार आहेत. या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. त्यानंतर भाजपा नेते किरीट्ट सोमय्या यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की, संजय राऊत यांना ईडीकडे हिशोब तर द्यावाच लागणार.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात