जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'उद्धव ठाकरेंच्या आजारपणाची संधी घेऊन एकनाथ शिंदे पळाले', राऊतांची बोचरी टीका

'उद्धव ठाकरेंच्या आजारपणाची संधी घेऊन एकनाथ शिंदे पळाले', राऊतांची बोचरी टीका

'उद्धव ठाकरेंच्या आजारपणाची संधी घेऊन एकनाथ शिंदे पळाले', राऊतांची बोचरी टीका

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर शिवसेनेनं हल्ला तीव्र केला आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवलाय.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर शिवसेनेनं हल्ला तीव्र केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. या आमदारांच्या फोटोला काळं अनेक ठिकाणी फासण्यात आलं. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना मुंबईत येण्याचं आव्हान दिलं आहे. त्यानंतर आता शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवलाय. ‘शिवसेनेचा भगवा या बेईमान गद्दारीला जाळून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असा इशारा राऊत यांनी दिला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई आणि महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवलं. सर्वोच्च न्यायालयानंही त्याची दखल घेतली. तेव्हा राज्यात लाखो लोकं मरावी म्हणजे राष्ट्रपदी राजवट लागेल, असं भाजपाला वाटत होतं. शिवसेनेच्या जळत्या निखाऱ्यात भाजपाला जाळून टाकू, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची संधी घेऊन एकनाथ शिंदे आता गुवाहाटीला पळून गेले आहेत, आता तेच लोक मंत्रीपदासाठी एकमेकांवर तुटून पडत आहेत. मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडली तर समजू शकतो. तो येईन-येईन म्हणतो आला नाही. हा बसणार-बसणार म्हणतो बसणार नाही, असा टोला राऊत यांनी  लगावला. यावेळी शिंदे यांना गद्दार असे म्हणत आणखी खालच्या भाषेत टिका केली आहे. 15 बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा; घरांबाहेर तैनात करणार CRPF आमदारांचं संरक्षण काढलंय, असं कोण म्हणतं त्यांनी हिंमत असेल तर यावं, केंद्र सरकार काश्मिरी पंडितांच्या ऐवजी यांचे संरक्षण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याचे उत्तर एक दिवस द्यावे लागेल, असे राऊत यावेळी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात