जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 15 बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा; घरांबाहेर तैनात करणार CRPF

15 बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा; घरांबाहेर तैनात करणार CRPF

15 बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा; घरांबाहेर तैनात करणार CRPF

अनेक शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसंच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर केंद्राने या आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 26 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. नाराज आमदारांनी बंड पुकारलेलं आहे. अशात शिवसैनिक मात्र भडकले आहेत. या पार्श्वभूमीवर काल अनेक शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसंच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर केंद्राने या आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे मुंबईत कधी येणार? दीपक केसरकर अखेर स्पष्टच बोलले शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. काल शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. काल झालेल्या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनांनंतर केंद्र सरकारने शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळपर्यंत 15 आमदारांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या राष्ट्रपती राजवट लागली तर काय कराल? दीपक केसरकरांनी सेनेला दिला थेट इशारा सध्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांच्या फोटोला काळं फासलं आहे. तर अनेक ठिकाणी आंदोलनही केलं गेलं आहे. अशात कुटुंबीयांना धोका असल्याची तक्रार काही आमदारांनी केली होती. यानंतर केंद्राने आमदारांच्या कुटुंबीयांना आज संध्याकाळपासून सीआरपीएफ सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 38 आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. गुवाहाटीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून आमदार तळ ठोकून आहे. पण, महाराष्ट्रातून शिंदे गटात दाखल झालेले अनेक आमदार हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. खुद्द संजय राऊत यांनीच आमदारांशी बोलणं होत असल्याचा दावा केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात