Home /News /mumbai /

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'त्या' विधानावर दिलं स्पष्टीकरण

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'त्या' विधानावर दिलं स्पष्टीकरण

शिवसेनेत सुरू असलेल्या बंडामध्ये भाजपाचा हात दिसत नाही, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केला होता.

    मुंबई, 24 जून : शिवसेनेत सुरू असलेल्या बंडामध्ये भाजपाचा हात दिसत नाही, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) गुरूवारी केला होता. अजितदादांचा हा दावा काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खोडून काढला होता. अजित पवारांना स्थानिक माहिती जास्त आहे. गुजरात आणि आसाममधील आम्हाला जास्त माहिती आहे, असं पवारांनी  स्पष्ट केले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यावर अजितदादांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले अजित पवार? 'मी महाराष्ट्रापुतं बोलतो. देशातील आणि इतर विषयांवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते बोलतात. शरद पवार यांनी एखाद्या विषयावर वक्तव्य केल्यावर त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे. आज सरकार बहुमतामध्ये आहेत. सर्व मंत्री मुंबईत आहेत. त्यामुळे सरकारला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा दावाही अजित पवारांनी केला आहे. अजित पवारांच्य या वक्तव्यानंतर या संकटात राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे सरकारच्या पाठिशी असल्याचं स्पष्ट झालं आहे. यापूर्वी, पत्रकारांशी बोलताना  आघाडी सरकार टिकणार की नाही, हे विधानसभेत ठरेल. हे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास  शरद पवारांनी व्यक्त केला आहे. बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात यावंच लागेल, असं पवारांनी स्पष्ट केलं.  विधानसभेच्या उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पवारांनी खास सूचना केल्या आहेत. त्यानुसार थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आऊट करण्याचा पवारांचा प्लॅन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेतील शिंदे समर्थक आमदार हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. पण, त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईमध्ये विधानसभेत यावे लागेल. त्यावेळी शिंदे यांना रोखण्याचा प्लॅन पवारांनी बनवल्याचं समजतंय. एकनाथ शिंदेंचा पत्ता लागला, दोन तासानंतर लोकेशन उघड दुसरिकडं, सध्या सुरू असलेल्या वेळकाढूपणाला छेद देण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्यामागे दोन तृतीयांश शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या गटाच्या मान्यतेसाठी त्यांनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Ajit pawar, Maharashtra politics, NCP, शरद पवार. sharad pawar

    पुढील बातम्या