Home /News /mumbai /

एकनाथ शिंदेंचा पत्ता लागला, दोन तासानंतर लोकेशन उघड

एकनाथ शिंदेंचा पत्ता लागला, दोन तासानंतर लोकेशन उघड

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही वेळापूर्वी पोलीस बंदोबस्तात दोन-तीन आमदारांसोबत हॉटेल रेडिसनमधून बाहेर पडले होते दोन तासानंतर त्यांचे लोकेशन उघड झाले आहे.

    मुंबई, 24 जून :  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही वेळापूर्वी पोलीस बंदोबस्तात दोन-तीन आमदारांसोबत हॉटेल रेडिसनमधून बाहेर पडले होते. मात्र, आता एक तास उलटूनही एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये परतलेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होत होता शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचंही सांगितलं जात होतं, पण शिंदे गुवाहाटीमध्येच असल्याचं उघड झालं आहे. संपर्कात होते. सुरुवातीला असं सांगितलं गेली की गुवाहाटीमध्येच काहीतरी कामासाठी गेले होते. पण, शिंदे नेमकं कुणाला भेटण्यासाठी हॉटेल सोडून गेले होते हा प्रश्न कायम आहे. आतापर्यंत हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक आमदाराच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे स्वतः हजर राहायचे. मात्र, नुकतंच दिलीप लांडे यांनी हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे इथे उपस्थित नव्हते. त्याचवेळी शिंदे गुवाहाटीमध्ये आहेत की अन्य ठिकाणी रवाना झालेत असा प्रश्न विचारला जात होता. राज्याच्या राजकारणाला नवे वळण विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळच नॉट रिचेबल राज्यात वेळकाढूपणाला छेद देण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्यामागे दोन तृतीयांश शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या गटाच्या मान्यतेसाठी त्यांनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या