मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा, आज नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा, आज नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता

Maharashtra Coronavirus situation: महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Coronavirus situation: महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Coronavirus situation: महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई, 8 जानेवारी : महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत (Coronavirus cases in Maharashtra) झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या काल (7 जानेवारी) दिवसभरात मॅरेथॉन बैठका पार पडल्या. त्या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरना स्थितीचा आढावा घेतला.

आज नियमावली जाहीर होणार?

रुग्णालयांवर ताण पडत नसल्याने मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण गर्दी टाळण्यासाठी काही निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्य सचिव, टास्क फोर्सचे सदस्य आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत सूर होता की, मोटा निर्णय घेण्याची आवश्यकता नाहीये. पण प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली काही निर्बंध लावण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने आज संध्याकाळपर्यंत निर्बंधांची नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे.

वाचा : मुंबईत कोरोनाची दैनंदिन संख्या 20000वर आता Lockdown लावणार? महापौरांनी म्हटलं...

मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध लावण्यात येणार आहेत. त्या संदर्भात लवकरच नियमावली जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव टाकरे हे सुद्धा राज्यातील जनतेशी संवाद साधणार असल्याचं बोललं जात आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधितांचा वाढता आकडा बघता सरकार नव्या निर्बंधांवर त्वरीत निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विकेंडसाठी काहीतरी नवी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. तसेच बाजारपेठेतील दुकानं अल्टरनेट डे सुरू ठेवण्याबाबतही प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी 40 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण

राज्यात शुक्रवारी नव्या कोरोना बाधितांचा संख्या थेट 40 हजारांच्या पार गेली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात तब्बल 40 हजार 925 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच दिवसभरात 20 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची देखील नोंद झाली. दुसरीकडे महाराष्ट्रात शुक्रवारी (7 जानेवारी) दिवसभरात 14 हजार 256 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात ओमायक्रॉनचा एकही नवा बाधित आढळलेला नाही. राज्य शासनाने जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकात याबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत 876 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झालेली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधित 565 बाधितांची नोंद आहे. त्यापाठोपाठ पुणे मनपा हद्दीत 83, पिंपरी चिंचवडमध्ये 45, ठाणे मनपा हद्दीत 36, नागपूर मनपा हद्दीत 30, पुणे ग्रामीण 29, पनवेल 17, नवी मुंबई आणि कोल्हापूर प्रत्येकी 10 अशा वेगवेगळ्या भागांच्या रुग्णांचा समावेश आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Lockdown, Uddhav thackeray