मुंबई, 8 जानेवारी : मुंबईत कोरोना (Coronavirus in Mumbai) बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या 20 हजारांहून अधिक आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं होतं की, जर मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या ही 20 हजारांचा टप्पा ओलांडेल तर लॉकडाऊन (Lockdown in Mumbai) किंवा कठोर निर्बंध लावण्यात (Strict Restrictions in Mumbai) येतील. आता मुंबईतील रुग्णसंख्या ही त्याच पद्धदतीने वाढत आहे त्यामुळे मुंबईत मिनी लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, 20 हजारच्या वर रुग्ण बाधित येत असले तरी लक्षणं असलेली रुग्ण संख्या कमी आहे. 20 हजार कोविड पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 17 हजार रुग्णांना लक्षणं नाहीत. लॉकडाऊन हा शब्द घाबरवण्यासाठी नाहीये. काळजी घेतली तर लॉकडाऊन लांब ठेऊ शकतो हे माझं म्हणणं आहे. लॉकडाऊन होणारच असं मी कधी बोलले नाही. विरोधक लोकांत संभ्रम निर्माण करतायत. घाबरणं हा आमचा स्वभाव नाही. 2500 रुग्ण सध्या उपचार घेतायत, आज नवे 950 रुग्ण दाखल झाले यातील 280 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. BKC मध्ये एकही ICU पेशंट नाही हा मोठा दिलासा आहे. 20 हजार रुग्ण असले तरी 17 हजार रुग्णांना लक्षणं नाहीत. घाबरू नका,नियम पाळा. याला विरोधक नाटक म्हणत असतील तर त्यांचा काय ड्रामा आहे का ? फुल लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊन अशी चर्चा सुरू आहे. मात्र निर्बंध येऊ शकतात असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. वाचा : “…तर मुंबईत लॉकडाऊन लागणार” मुंबई मनपा आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं विरोधकांवर निशाणा महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, खुर्चीत बसून टीका करणं सोपं असतं, प्रत्यक्ष काम करुन दाखवा असं आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी टाका करणाऱ्या भाजप नेत्यांना दिलं आहे. विरोधक घरात बसून आकडे लावतात, आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतो. आकडे काय खोटे आहे का ? विरोधक अर्थाचे अनर्थ करतायत. विरोधकांनी लोकांना उकसवू नका, घाबरवू नका. कावीळ झाली की सगळं पिवळच दिसतं. आशिष शेलार यांना आलेल्या धमकीवर प्रतिक्रिया देताना महापौर म्हणाल्या, विरोधकांसोबत वैचारिक विरोध, अशा धमक्या येणं चुकीचं आहे. मी स्वतः आयुक्तांशी बोलणार आहे, जीवघेणं राजकारण नको. नागरिकांनी घाबरण्यापेक्षा काळजी घ्यावी, कोरोनाचं संकट गंभीर आहे. आम्ही संकटांना घाबरत नाही असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.