Home /News /mumbai /

मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांविरोधात आणला विशेष हक्कभंग!

मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांविरोधात आणला विशेष हक्कभंग!

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहमंत्री अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती.

    मुंबई, 09 मार्च : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून (Anvay Naik suicide case) अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget 2021)  गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. त्यामुळे फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात विशेष हक्कभंग सूचना मांडली. 'अन्वय नाईक यांच्या खटल्यमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबली, असं वक्तव्य देशमुख यांनी केलं आणि त्याची दुरुस्ती केली. त्यांची आत्महत्या झाली आहे. असं स्टेटमेंट त्यांच्या पत्नी आणि मुलीने दिलं आहे. तसंच सुप्रीम कोर्टाने याबद्दलचे स्पष्ट अभिप्राय नोंदविलेले आहेत. हे प्रकरण दाबले असं म्हणणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान केला आहे. माझा आणि सुप्रीम कोर्टाचा देशमुख यांनी अवमान केला आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू जखमी, मुंबई इंडियन्सच्या बॉलरचा होणार समावेश! तसंच, सुप्रीम कोर्टाचा निकाल गृहमंत्र्यांना माहिती असूनही त्यांनी सभागृहाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. सरकारला जाब विचारण्याचा माझा अधिकार आहे त्यापासून माझा हक्क दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विशेष हक्कभंग समितीकडे हे प्रकरणे देण्यात यावं, अशी मागणी फडणवीस यांनी केली. तसंच, 'मराठा आरक्षणाच्या बाबत अशोक चव्हाण यांचे विधान असत्य आणि दिशाभूल करणारी आहे. मी त्यांच्याविरोधात विशेषाधिकाराची हक्कभंगाची सूचना मांडतो आहे', असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उपाध्यक्ष झिरवळ यांनी हे प्रकरण मी तपासून घेईन, असं आश्वासन दिले. काय घडले होते सभागृहात! मनसुख हिरेन प्रकरणावर मंगळवारी भाजप आमदारांनी अधिवेशनात जोरदार राडा घातला. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर निवेदन केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुमच्यासमोर वाझे यांना निलंबित करण्याचं ठरलं होतं पण मग आता कोणावर दबाव आहे? जर वाझे यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला मग तो आता का जाहीर करत नाही', असं फडणवीस म्हणाले होते. उत्तराखंडमध्ये गुजरात पॅटर्न! RSS च्या माजी प्रचारकाची मुख्यमंत्री पदासाठी निवड त्यानंतर सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अन्वय नाईक याच प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी दाबलं, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, सचिन वाझे या प्रकरणाचा तपास करत आहे म्हणून भाजपच्या नेत्यांचे बिंग फुटणार आहे. त्यामुळे भाजपचे नेते त्यांच्या निलंबनाची मागणी करत आहे, असा आरोप जाधव यांनी केली. अन्वय नाईक प्रकरणाची आम्हाला चौकशी करायची आहे, हे प्रकरण दाबले गेले आहबे” असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते.  त्यानंतर 'अन्वय नाईक प्रकरणाची काय चौकशी करायची आहे ती खुशाल करा, असं आव्हानच फडणवीस यांनी दिले होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Anil deshmukh, Budget 2021, Devendra Fadnavis, Maharashtra, Mumbai

    पुढील बातम्या