Maharashtra Budget : केंद्रावर टीका पण गडकरींचे मानले आभार, अर्थसंकल्पात अजित पवारांची गुगली

Maharashtra Budget : केंद्रावर टीका पण गडकरींचे मानले आभार, अर्थसंकल्पात अजित पवारांची गुगली

महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. मात्र यावेळी अजित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

  • Share this:

मुंबई, 06 मार्च : महाविकास आघाडी सरकाराच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करत आहेत. यात महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांचा चिंतामुक्त करण्याचा प्रयत्न करेल, असे सांगत अजित पवारांनी 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मात्र अर्थसंकल्प मांडत असताना अजित पवारांनी केंद्र सरकारवरही टीका केली.

अजित पवार आज ठाकरे सरकारचे पहिले अर्थसंकल्प मांडत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेताच केंद्रावर टीका केली. महाराष्ट्राला महापूराचा फटका बसला असताना केंद्राने मदत केली नसल्याची तक्रार यावेळी अजित पवारांनी केली. कोल्हापूर, सातारा यांसारख्या जिल्ह्याला महापूराचा फटका बसला, यावेळी राज्याने केंद्राकडे 1400 कोटींची मदत मागितली असताना केंद्राने केवळ 700 कोटी दिले, असे सांगितले. त्यामुळं राज्याला याचा मोठा फटका बसला.

वाचा-Maharashtra Budget :मोठी घोषणा, 10 रुपये थाळी योजना लाभार्थी संख्या दुप्पट करणार

तर दुसरीकडे अजित पवारांची अर्थसंकल्प मांडत असताना रस्ते, वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे आभारही मानले. अर्थसंकल्प मांडत असताना अजित पवारांनी, गडकरी यांनी रस्त्यांसाठी नितीन गडकरींनी 1200 कोटी केंद्रीय फंडातून देण्याचं कबूल केलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी यांची भेट झाली यावेळी राज्य सरकारसाठी गडकरींनी मदत केली, त्याबद्दल सभागृहात अजित पवारांनी त्यांचे आभार मानले. गडकरींनी, आठ पदरी- चार पदरी रस्त्यासाठी राज्य सरकारला केलेली ही मदत आहे.

वाचा-VIDEO : देवेंद्र फडणवीस vs भाजप खासदार असा रंगला सामना! बोल्ड की सिक्सर?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाला 8500 कोटी देणार असल्याचेही यावेळी अजित पवारांनी सांगितले. तसेच, या मार्गावर 40 कृषी समृद्धी केंद्र स्थापन करणार असल्याचे यावेळी मान्य केले. त्याचबरोबर नव्याने नागरी सडक योजना राबवणार असून त्यासाठी 2700 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

वाचा-'अयोध्येला जाताय तेव्हा जनाची नाही तर...' मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

सर्व योजना पूर्ण करण्याची घेतली जबाबदारी

राज्यातील शेतकरी, महिला, तरुणांची अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. हे आव्हान स्वीकारत राज्याला पुढील वाटचाल करावी लागणार आहे. दिल्लीतील सरकारला दोष देण्यासाठी हे मांडत नाही. असमर्थता को देखो और स्वीकार करो, असं त्यांनी नमूद केलं.

First published: March 6, 2020, 11:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading