• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Maharashtra Budget Live : सर्वसामन्यांना मोठा झटका, अर्थसंकल्पानंतर पेट्रोल-डिजेल महागणार

Maharashtra Budget Live : सर्वसामन्यांना मोठा झटका, अर्थसंकल्पानंतर पेट्रोल-डिजेल महागणार

ठाकरे सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ज्यादा 7 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यासंदर्भात तरतूद करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम व्यवसायिक, बेरोजगार तरुण यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 • News18 Lokmat
 • | March 06, 2020, 12:43 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  13:17 (IST)

  केंद्र सरकारवर टीका करून नकारात्मक सुरुवात करण्यात सरकारनं धन्यता मानली आहे- फडणवीस

  13:16 (IST)

  अनेक घोषणा या केवळ केंद्र सरकारच्या भरवशावर केल्या आहेत- देवेंद्र फडणवीस

  13:14 (IST)

  सत्तेचं दिलेलं वचन यांना लक्षात आहे पण शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलेली वचनं मात्र लक्षात नाहीत- फडणवीस

  13:14 (IST)

  शेतकऱ्यांच्याही तोंडाला ठाकरे सरकारनं पानं पुसली- देवेंद्र फडणवीस

  13:13 (IST)

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका

  13:13 (IST)

  कोकणाच्या तोंडाला पान पुसली, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा उल्लेख नाही- देवेंद्र फडणवीस

  12:17 (IST)

  एसटी महामंडळात नवीन 1600 बस दाखल होणार, राज्यात पेट्रोल-डिझेलवर 1 रुपया अतिरिक्त कर आकारण्यात येणार आहे- अजित पवार

  12:12 (IST)

  वडाळा येथे नवीन GST भवन बांधणार- अजित पवार

  12:12 (IST)

  1000 मुलांसाठी पुण्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय- अजित पवार

  12:12 (IST)

  बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी सवलत, मुंबई महानगरात मुद्रांत शुल्कात एक टक्का सूट देण्यात येणार आहे.- अजित पवार

  मुंबई, 06 मार्च: अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ज्यादा 7 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यासंदर्भात तरतूद करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम व्यवसायिक, बेरोजगार तरुण यांना मोठा दिलासा मिळणार आहे.