'अयोध्येला जाताय तेव्हा जनाची नाही तर...' मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

'अयोध्येला जाताय तेव्हा जनाची नाही तर...' मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्च रोजी अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याआधी त्यांच्यावर टीका केली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 06 मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्च रोजी अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याआधी त्यांच्यावर टीका केली जात आहे. याआधी अयोध्येतील तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास नाराज असून त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मक्का येथे जाण्याचा सल्ला दिला होता. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी, अयोध्येचा इतिहास लक्षात ठेवा असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनेक शिवसैनिक अयोध्येत दर्शन घेण्यासाठी पोहोचणार आहेत. मात्र या दौऱ्याआधी संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी, “लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडीलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून चौदा वर्ष वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले .पण भरताने संधीसाधू पणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले.असा इतिहास असलेल्या अयोध्येला जाताय तेंव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी….शुभेच्छा”, अशी खोचक टीका करणार ट्वीट केले आहे.

वाचा-ठाकरे सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प, शेतकरी आणि गृहिणींना दिलासा मिळणार?

वाचा-CAA, NPR आणि NRC बद्दल ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

दरम्यान, महाविकास आघाडी सरकाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे या दौरा करणार आहेत. मात्र त्याआधी मनसेकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याआधी सरकार स्थापन झाले तरी उद्धव ठाकरे अयोध्येला का नाही गेले?, असा सवालही विचारण्यात आला होता.

वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना दिलं खास गिफ्ट

याआधी 2 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी लोकसभा निवडणुकीची चर्चा जोरात होती. निवडणुकीदरम्यान शिवसेना – भाजपमध्ये राजकीय संबंध देखील ताणले गेले होते. पण, लोकसभा निवडणुकीमध्ये युती केल्यानंतर शिवसेना – भाजपला राज्यात मोठं यश मिळालं. लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जात थेट भाजपला आव्हान दिलं होतं. नंतर भाजप आणि शिवसेनेच दिलजमाई झाली आणि राजकीय परिस्थिती बदलली. त्यावेळी मी पुन्हा अयोध्येत येईल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

First published: March 6, 2020, 10:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading