Home /News /mumbai /

देवेंद्र फडणवीस vs भाजप खासदार असा रंगला सामना! बोल्ड की सिक्सर? पाहा VIDEO

देवेंद्र फडणवीस vs भाजप खासदार असा रंगला सामना! बोल्ड की सिक्सर? पाहा VIDEO

देवेंद्र फडणवीस यांची क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग. भिवंडीत रंगला अनोखा क्रिकेट सामना.

    भिवंडी, 06 मार्च : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस राजकारणात अनेकदा विरोधकांमुळे बोल्ड झाले आहेत. मात्र क्रिकेटमध्ये त्यांची विकेट घेणे सोपे नाही आहे. नुकताच त्यांचा क्रिकेटर अंदाज पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच खासदाराच्या गोलंदाजीवर जोरदार बॅटिंग केली. भिवंडी येथे क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेदरम्यान आलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांनी शानदार बॅटिंग करत सर्व चेंडू सीमापार केले. यावेळी कपिल पाटील यांनी फडणवीस यांना गोलंदाजी केली तर, देवेंद्र फडणवीस यांनी मोठे शॉट लगावले. वाचा-'अयोध्येला जाताय तेव्हा जनाची नाही तर...' मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका वाचा-Yes बँकेवरील निर्बंधामुळे शेअर मार्केट गडगडलं,सेन्सेक्स1 हजार 400 अंकांनी कोसळला देवेंद्र फडणवीसांना नोटीस फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करून सरकारी कर्मचाऱ्यांचे खाते अॅक्सिस (Axis) बँकेत वळवल्याचा आरोप फडणवीसांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी नागपूर खंडपीठाने फडणवीस यांच्यासह राज्याच्या मुख्य सचिवांनाही नोटीस बजावली आहे. पुढील आठ आठवड्यात कोर्टात उत्तर सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या आदेशानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी परिपत्रक काढून सरकारी कर्मचाऱ्यांची एसबीआय व इतर राष्ट्रीयीकृत बँकांमधील खाती अॅक्सिस बँकेत वळती करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप करणारी जनहित याचिका मोहनीश जबलापुरे यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. वाचा-भगवान रामाची भूमिका करणाऱ्या कलाकाराला केला जातो 'बोल्ड' फोटो शूटचा आग्रह
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या