मुंबई, 06 जुलै: पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Session) भाजपच्या (BJP) आमदारांनी आज दुसऱ्या दिवशीही जोरदार राडा घातला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आमदारांसह विधानभवनाच्या बाहेर आंदोलन केले. यावेळी, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्या वन खात्यात बदल्यासाठी रेट कार्ड ठरले असून 5-10 लाख रुपये घेतले जात आहे, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून भाजपचे प्रतिविधानसभा भरवली होती. पण, माईक आणि टेबल हटवल्यामुळे वाद चिघळला होता. त्यानंतर पत्रकारांच्या दालनात भाजपने प्रतिविधानसभा भरवून ठाकरे सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
सावधान! चुकूनही Credit Card ने करू नका या गोष्टींसाठी Payment, अन्यथा...
'मुख्यमंत्री महोदय तुमच्या नाकाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या यांच्या वन खात्यात बदल्यासाठी रेट कार्ड झाले असून ५-१० लाख घेतात. मी मुख्यमंत्री ठाकरे पैसे घेतात असं म्हणणार नाही पण त्याच्या खात्यात रेट कार्ड काम सुरू आहे, यावर कारवाई करणार का ? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थितीत केला.
'प्रकल्पाला नाव देतात पण त्याची ऑनर्शिप घेता येत नाही. स्मार्ट सिटीला बाळासाहेब यांचे नाव दिले. त्यात काहीच काम झाले नाही. जनाची नाही तर मनाची ठेवा. आदिवासी कुठलेही मार्क नसलेले पदार्थ दिले जात आहे. यावर शासनाचे मोहर नाही, असे पदार्थ आदिवासींना देणे हा गुन्हा आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
'जे मुघल, इंग्रज यांना जमले नाही ते या सरकारने करून दाखवली, वारकरी लोकांना अटक केली जात होती. सर्व जबाबदारी केंद्र सरकारची मग राज्य सरकार काय भजी तळायला ठेवलं का? वसुलीच काम प्रत्येक काम सुरू खात्यात, प्रत्येक खात्यात वाझे आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
सिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्यानं तरुणाला मारहाण; कत्तीनं जीवघेणा हल्ला
पत्रकारांवर दबाव आणण्याचा काम सरकारने केले आहे. लोकल पास दिला जात नाही, मार्शल पाठवून पत्रकारांना हटवले जात आहे. लोकशाहीची जाण त्यांना नाही पण आम्हाला आहे. गोंधळ आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दा आम्ही मांडतो म्हणून माईक जप्त केला. आमचा आवाज कोणीच दाबू शकत नाही, आमचा डीएनए त्यांना माहिती नाही, इंदिरा गांधी आवाज दाबू पाहत होते पण तरी ही आम्ही मागे हटलो नाही, असंही फडणवीस म्हणाले.
कोरोना रू्गण संख्या सर्वाधिक महाराष्ट्रात आहे. ३१ टक्के मृत्यू महाराष्ट्रात असून अनेक मृत्यू लपवले गेले. मुंबई, पुणे इकडेच लक्ष असून बाकी कोणालाच काही घेणे देणे. सर्वाधिक लसीकरण केंद्र सरकारने दिले, मोदींनी लशी दिल्या म्हणून जास्त लसीकरण झाले, असंही फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly session, BJP, Devendra Fadnavis, Maharashtra, Mumbai, Pune, Uddhav thackeray