मुंबई, 06 जुलै: पावसाळी अधिवेशनाचे (Maharashtra Assembly Session) अखेर सूप वाजले आहे. दोन दिवसीय अधिवेशन शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी तालिका अध्यक्ष बनून चांगलेच गाजवले. 'भाजपवर जी काही परिस्थिती ओढावली आहे, ती त्यांना टाळता आली असती. मुळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सभागृहात एक बोलता आणि बाहेर एक बोलता' असं म्हणत जाधव यांनी पहिल्यांदाच विधानभवनाबाहेर प्रतिक्रिया दिली.
टीव्ही 9 मराठी वृतवाहिनीशी बोलत असताना भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा सभागृहात घडललेल्या घटनेबद्दल माहिती दिली. तसंच, मला दुसऱ्या दिवशी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली, असा दावा जाधव यांनी केली.
'भाजपवर जी काही परिस्थिती ओढावली आहे, ती त्यांना टाळता आली असती. मुळात टाळी कधी एका हाताने वाजत नाही. माझ्याशी वाद घालण्याचं काहीच कारण नव्हते. सरकारसोबत वाद घालायला पाहिजे होता. आपण काही गोष्टी सोईस्करपणे विसरतो. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल ठराव मांडला होता. त्यांनी ठराव मांडल्यानंतर त्यांना काही सुचना द्यायच्या असतील, काही हरकत घ्यायची असेल तर त्यांनी बोललं पाहिजे. पण, फडणवीस यांचं अधिवेशनाच्या सुरुवातीपासून काय बिनसलं होतं हे काही कळायला मार्ग नाही, असा टोला जाधव यांनी फडणवीसांना लगावला.
खुशखबर! मारुती कंपनीच्या कारवर भरघोस डिस्काऊंट; जाणून घ्या अधिक माहिती
फडणवीस अधिवेशनात अशा पद्धतीने आक्रमक झाले होते की, ते कुणालाच बोलू देत नव्हते. मंत्री काय बोलत आहे हे मला माहिती आहे अशा अविर्भावात ते बोलत होते, हे कोणत्या संसदीय कामकाजात बसते. भुजबळ यांनी शांतपणे आणि पुराव्यानिशी उत्तरं दिली होती. सर्व सदस्यांनी शांतपणे ऐकून घेतले होते. पण फडणवीस हे काही ऐकण्याच्या तयारीतच नव्हते, असंही जाधव म्हणाले.
बापरे! आता आधीच कळेल मृत्यूची तारीख, मरणाची भविष्यवाणी करणारं कॅलक्यूलेटर
'भाजपच्या आमदारांना मी शिवीगाळ केली असा आरोप फडणवीस करत आहे. पण, ते काय आरोप करता हे यापेक्षा ते सभागृहात काय बोलतात हे महत्त्वाचं आहे. सभागृहात त्यांनी आमचे दोन-चार लोकं हे चुकीचे बोलले होते. याबद्दल भास्कररावांची माफी मागितली होती, असं फडणवीस सभागृहात बोलले होते. आता ते सभागृहात एक बोलता आणि बाहेर वेगळंच बोलतात, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly session, Devendra Fadnavis, Maharashtra, Maharashtra News, Mumbai, Mumbai News, Season