मुंबई, 6 जुलै- कोरोना महामारीमुळे सर्व उद्योगधंदे बंद होते. आता उद्योगचक्राला गती मिळत आहे. व्यवसाय नोकऱ्या हळूहळू सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वस्तूंची विक्रीही सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कार उत्पादक कंपनी होंडाने
(Honda) आपल्या वाहनांची इनपुट कॉस्ट वाढवण्याचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून होंडाच्या कारच्या किमतीही वाढू शकतात. त्याचवेळी मारूती सुझुकी
(Maruti-Suzuki) कंपनीने मात्र काही निवडक मॉडेल्सवर 54 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट
(Discounts) जाहीर केला आहे. जुलै महिन्यात कार किंवा प्रवासी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला रोख डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटही मिळणार आहे. अल्टोपासून ते स्विफ्टपर्यंत वेगवेगळ्या कारवर सूट देण्यात येणार आहे. अर्टिगा या कारवर मात्र कोणतीही सवलत देण्याचं कंपनीने जाहीर केलेलं नाही.
मारुती ऑल्टो (Maruti Alto):
भारतातील सर्वांत लोकप्रिय लहान कारपैकी अल्टो ही कार आहे. या कारवर 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 3 हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिन मॉडेलवर रोख 25 हजारांची तर सीएनजी इंजिनच्या मॉडेलवर 10 हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे.
मारुती सेलेरियो और सेलेरियो एक्स (Maruri celerio):
मारुती सेलिरिओ आणि सेलेरिओ एक्स या दोन गाड्यांवर 15 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाणार आहे. या गाड्यांवर कोणतीही रोख सूट देण्यात आलेली नाही.
(हे वाचा: )
मारुती डिझायर (Maruti Dzire):
सेडान श्रेणीतल्या या पाच आसनी कारवर 20 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 10 हजार रुपयांची रोख सूट देण्यात येत आहे.
मारुती ईको (Maruti Eeco):
मारूतीची ईको ही मिनी व्हॅन जर तुम्ही विकत घेणार असाल तर तुम्हाला 10 हजार रुपयांची रोख सूट आणि 15 हजार रुपये एक्सचेंज बोनस तसंच 3 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाणार आहे.
मारुती एस-प्रेसो (Maruti Spresso):
या कारच्या पेट्रोल इंजिन मॉडेलवर 25 हजार रुपयांची रोख सूट मिळेल तर चारचाकी सीएनजी मॉडेलवर 10 हजार रुपयांची रोख सूट मिळू शकेल. तसंच 15 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाणार आहे.
(हे वाचा:
Alert! घरातील गॅस, विजेच्या Smart Meters मार्फत तुमच्यावर कुणाचा वॉच तर नाही ना?)
मारुती स्विफ्ट (Maruti Swift):
ही मारुतीची लोकप्रिय गाडी आहे. या कारवर 20 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाणार आहे. कारच्या LXI मॉडेल वर 10 हजार रुपयांची रोख सूट दिली जात आहे तर ZXI आणि ZXI+ यावरही 15 हजारांची रोख सूट उपलब्ध असेल. स्विफ्ट व्हीएक्सआय वर 30 हजार रुपये रोख सूट मिळू शकते.
मारुती व्हिटारा ब्रेझा (Vitara brezza):
ही कार विकत घेऊ इच्छिणाऱ्यांना 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 15 हजारांची रोख सूट आणि 4 हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळणार आहे.
मारुती वॅगन-आर (Maruti WagonR):
मारुतीच्या सर्वाधिक लोकप्रिय कारपैकी ही एक कार आहे. पेट्रोल इंजिनची वॅगन आर तुम्ही घेतलीत तर तुम्हाला 15 हजार रुपयांची रोख सूट आणि कॉर्पोरेट डिस्काउंट 15 हजार रुपये मिळेल. सीएनजी इंजिनच्या मॉडेलवर रोख सूट 5 हजार रुपये आणि कॉर्पोरेट डिस्काउंट 15 हजार रुपये मिळेल.
चला तर म सज्ज व्हा नवी कार घ्यायला अर्थात निवड तुमची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.