'युती'ला धडा शिकविण्यासाठी 'मनसे' राष्ट्रवादीची छुपी खेळी!

मतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक काही ठिकाणी आपल्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली तर काही ठिकाणी त्यांनी उमेदवारच उभे केले नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 03:21 PM IST

'युती'ला धडा शिकविण्यासाठी 'मनसे' राष्ट्रवादीची छुपी खेळी!

अजित मांढरे 07 ऑक्टोंबर : विधानसभेच्या निवडणुका मनसे स्वतंत्रपणे लढवत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा मनसेला पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालंय. मतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक काही ठिकाणी आपल्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली तर काही ठिकाणी त्यांनी उमेदवारच उभे केले नाहीत. ठाणे शहर आणि कल्याण ग्रामीण या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार मागे घेतल्याने आता मनसे विरुद्ध भाजप किंवा शिवसेना असा थेट सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी आणि मनसेची ही खेळी आता किती रंगत आणणार हे निवडणुकीत दिसणार आहे. ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनाच भाजपने तिकीट दिलंय. तिथे राष्ट्रवादीचे सुहास देसाई यांनी माघार घेतलीय त्यामुळे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.

'भाजपने आम्हाला धोका दिला', विधानसभेसाठी महादेव जानकरांनी जाहीर केली भूमिका

आता या मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे असा थेट सामना होणार आहे. भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मनसेचाही थोडा जोर आहे. भाजपला फायदा मिळू नये यासाठी राष्ट्रवादी मनसेच्या मदतीला धावून गेलीय. राष्ट्रवादीचा तोच पॅटर्न कल्याण ग्रामीणमध्येही बघायला मिळाला. या मतदार संघात राष्ट्रवादीने आपला उमेदवारच उभा केलेला नाही.

हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असून शिवसेनेकडून रमेश म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलंय तर मनसेकडून राजू पाटील यांना उमेदवारी मिळालीय. त्यामुळे आता मनसे विरुद्ध शिवसेना असा थेट सामना या ठिकाणी होणार आहे. मनसे करता मागे घेतल्याची  कबूली या नेत्यांनी खासगीत बोलताना दिलीय.

मुख्यमंत्र्यांच्या हालचालींना पहिलं यश, 'या' मतदारसंघात उमेदवारी माघार

Loading...

पुण्यात ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना

निवडणूक आली की नेत्यांची जाहीर सभांमधूनच जुगलबंदी सुरू होती. त्यात जर दोन ठाकरे आमने सामने आल्यानंतर ही जुगलबंदी टीपेला पोहचते. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव हे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत.

राज ठाकरे यांची 9 ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी 7 वाजता सभा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणा लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

रोहित पवारांचा अर्ज झाला बाद, तरीही राष्ट्रवादीला मोठा दिलासा

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून शांत असल्याने मनसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यात 9 ऑक्टोबरला पहिली सभा घेऊन विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांची अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...