रोहित पवारांचा अर्ज झाला बाद, तरीही राष्ट्रवादीला मोठा दिलासा

रोहित पवारांचा अर्ज झाला बाद, तरीही राष्ट्रवादीला मोठा दिलासा

हाय व्होल्टेज लढतीत राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

मुंबई, 7 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीतील काही लढतींनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघाचाही समावेश आहे. कारण या मतदारसंघात भाजप नेते आणि मंत्री राम शिंदे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी युवा नेते रोहित पवार यांनी आव्हान दिलं आहे. या हाय व्होल्टेज लढतीत राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राजकारणात प्रतिस्पर्धावर कुरघोडी करण्यासाठी वेगवेगळे डाव टाकले जातात. अनेकदा एखाद्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावाचा उमेदवार उभा करून मतांचं विभाजन केलं जातं. कर्जत जामखेडमध्ये रोहित राजेंद्र पवार या नावाने बीड जिल्ह्यातील एका तरूणाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याने बीडच्या रोहित पवारचा अर्ज बाद करण्यात आला आहे. हा राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यासाठी मोठा दिलासा समजला जात आहे.

भाजपला रोहित पवारांचं आव्हान

पवार कुटुंबातील तरुण पिढी आता राजकारणात सक्रिय होत आहे. पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर आता रोहित पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

विधानसभेसाठी कर्जतमधून उमेदवारी मिळावी अशी त्यांनी पक्षाकडे केली होती. रोहित यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे मुलाखतही दिली. त्यानंतर आता ते कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवतील हे निश्चित झालं.

Loading...

रोहित पवारांनी कर्जत भागात गेली काही वर्ष सतत दौरे करत कार्यकर्त्यांची फळीही तयार केली आहे. याआधी त्यांनी पुण्याच्या हडपसरमधूनही चाचपणी केली होती. मात्र अखेर त्यांनी आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कर्जत मतदारसंघावर शिक्कामोर्तब केलं.

SPECIAL : 'रावडी नितीन' : 'डॅशिंग' नितीन नांदगावकरांची बेधडक मुलाखत एकदा ऐकाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 11:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...