Elec-widget

'भाजपने आम्हाला धोका दिला', विधानसभेसाठी महादेव जानकरांनी जाहीर केली भूमिका

'भाजपने आम्हाला धोका दिला', विधानसभेसाठी महादेव जानकरांनी जाहीर केली भूमिका

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 7 ऑक्टोबर : जागावाटपातील गोंधळावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. 'भाजपने आम्हाला धोका. आमच्या उमेदवारांना त्यांनी स्वत:चा एबी फॉर्म दिला,' असं म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

'महायुतीमध्ये आम्हाला 2 जागा आमच्या पक्षाच्या चिन्हावर देण्यात आल्या होत्या. मात्र भाजपने आम्हाला त्यांचाच एबी फॉर्म ofne. आमच्या उमेदवारांचा दोष आहे की त्यांनी तो फॉर्म स्वीकारला. दौंडला राहुल कुल आणि जिंतूरला मेघन बोर्डीकर हे आता आमचे उमेदवार नाहीत,' असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

'...पण आम्ही भाजपचाच प्रचार करणार'

जागावाटपावरून महादेव जानकर यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली असली तरीही आपण विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबतच असल्याचंही स्पष्ट केलं आहे. 'आम्ही भाजप शिवसेना युतीसोबतच आहे. त्यांच्या जागांवर प्रचार करू. पण दौंड आणि जिंतूरचे उमेदवार ज्यांनी भाजपचा एबी फॉर्म भरला आहे ते आता आमच्यात नाही,' अशी भूमिका महादेव जानकर यांनी घेतली आहे.

जानकरांच्या नाराजीचं कारण काय?

Loading...

दौंड विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार आमदार राहुल कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केल्यामुळे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. कारण महायुतीमध्ये रासपच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवार हे कमळ या चिन्हावर नव्हे तर रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी भूमिका महादेव जानकर यांनी घेतली होती.

आमदार राहुल कुल यांनी तीन फॉर्म भरले आहेत. त्या फॉर्ममध्ये राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून एक अर्ज दाखल केला. पण त्या सोबत राष्ट्रीय समाज पक्षाचा AB फॉर्म जोडला नाही तर दोन फॉर्म भाजप या पक्षा कडून भरले आहेत. त्यासोबत भाजपचा AB फॉर्मदेखील जोडला आहे. आमदार राहुल कुल यांचा फॉर्म भरण्यासाठी महादेव जानकर देखील उपस्थित होते. त्यामुळे त्यांना याबद्दल माहिती होती की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राहुल कुल यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढवली होती. तर राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी यंदाची लोकसभा निवडणूक मात्र भाजपकडून लढवली. राज्यात युतीची सत्ता आल्यावर राहुल कुल यांची भाजपसोबत जवळीक वाढल्याने ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र ते रासपच्याच तिकिटावर निवडणुकीला उभा राहात आहेत, असं सांगितलं गेलं. प्रत्यभात मात्र त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत भाजपचा एबी फॉर्म जोडल्याने महादेव जानकर यांना चांगलाच धक्का बसला आहे.

SPECIAL : 'रावडी नितीन' : 'डॅशिंग' नितीन नांदगावकरांची बेधडक मुलाखत एकदा ऐकाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 02:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...