मुख्यमंत्र्यांच्या हालचालींना पहिलं यश, 'या' मतदारसंघात उमेदवाराने अर्ज घेतला मागे

बंडखोरीचा फटका बसू नये म्हणून त्यांना थंड करण्याचा प्रयत्न आता पक्षनेतृत्वाकडून केला जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 12:48 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या हालचालींना पहिलं यश, 'या' मतदारसंघात उमेदवाराने अर्ज घेतला मागे

दिपक बोरसे, धुळे, 7 ऑक्टोबर : उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर बंडखोरीमुळे राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. या नेत्यांच्या बंडखोरीचा फटका बसू नये म्हणून त्यांना थंड करण्याचा प्रयत्न आता पक्षनेतृत्वाकडून केला जात आहे. भाजपमधून बंडखोरी केलेल्या उमेदवारांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संपर्क साधून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगत आहेत.

धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी झाली आहे. भाजपमधील धुळे शहरातील बंडखोरी दूर झाली. डॉ माधुरी बोरसे यांची निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर डॉ माधुरी बोरसे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपकडून 27 मतदारसंघात तब्बल 114 जणांनी बंडखोरी केली आहे. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भाजपचे सर्वाधिक 9 बंडखोर आहेत. विधानसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या किती बंडखोर आपली उमेदवारी मागे घेतात, त्यावर राज्याच्या राजकारणाची गणितं ठरू शकतात.

राज्यातील तब्बल 798 उमेदवारांचं विधानसभा गाठण्याचं स्वप्न भंगलं

विधानसभा गाठण्यासाठी उमेदवार 5 वर्ष आपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी करत असतात. पण मोक्याच्या क्षणी झालेली एक चूक त्यांना निवडणूक लढवण्यापासून दूर ठेवते. अर्ज भरण्यात केलेल्या अशाच चुकीमुळे यंदा राज्यातील तब्बल 798 इच्छुक निवडणूक लढवू शकत नाहीत. असं असलं तरीही राज्यभरातील तब्बल 4739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी यातील प्रत्येकजणच प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे.

Loading...

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल 5543 उमेदवारांपैकी 4739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने 798 उमेदवारांचे अर्ज नामंजुर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

SPECIAL : 'रावडी नितीन' : 'डॅशिंग' नितीन नांदगावकरांची बेधडक मुलाखत एकदा ऐकाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 12:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...