मुंबई, 21 जून : विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेतील संकट वाढलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असून ते समर्थक आमदारांसह सूरतमध्ये आहेत. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना संकटात आहे. शिवसेनापाठोपाठ काँग्रेसमध्येही भूकंप होण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
पराभवानंतर राजीनामा?
विधान परिषदेतील काँग्रेसचा झालेला पराभव महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. निकालानंतर त्यांना माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. थोरात म्हणाले, की हा पराभव धक्कादायक असून सर्वांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. तसेच ते पुढे म्हणाले की सर्व गोष्टी आपल्या बाजून असतानाही पराभव होत असेल तर सरकार म्हणून विचार करण्याची गरज आहे' असं मत त्यांनी व्यक्त केले होते. काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून थोरात राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
महाविकास आघाडी सरकार संकटात, शिवसेना आमदारानंतर खासदारही नॉट रिचेबल!
राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही कुठलीही चूक होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील पक्षांनी विशेष काळजी घेतली होती. असे असतानाही आघाडीची एकदोन नाही तर तब्बल 21 मतं फुटली आहे. यात काँग्रेसची 3 मतं फुटल्याचे समोर आले आहे. कारण, काँग्रेसला 44 पैकी फक्त तीन मते मिळाली आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आमने सामने होते. यात भाई जगताप यांचा विजय झाल्याने चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.