जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / महापरिनिर्वाण दिन : मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पुढील 3 दिवसांच्या वाहतूकीमधील बदल

महापरिनिर्वाण दिन : मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पुढील 3 दिवसांच्या वाहतूकीमधील बदल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 5 डिसेंबर : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी परिसरात लाखोंची गर्दी होत असते. ही गर्दी लक्षात घेऊन मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. सोमवार ते बुधवार या तीन दिवसांसाठी हा बदल असेल. सोमवारी सकाळी 6 ते बुधवारी रात्री 12  या कालवधीमध्ये हे बदल लागू असतील.  अत्यावश्यक वाहनांना माहिमकडे जाण्यासाठी सिद्धीविनायक जंक्शन ते हिंदुजा हॉस्पिटल पर्यंत दक्षिण वाहिनीवर राखीव मार्गिका ठेवण्यात येणार आहे.याबाबत वाहतूक पोलीस मुख्यालय व मध्यविभागाचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी हे आदेश दिले आहेत. काय आहेत बदल? शिवाजी पार्क परिसरात नो पार्किंग झोन असेल. तर, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज रोड, रानडे रोड, पांडुरंग नाईक मार्ग, एन.सी. केळकर मार्ग, डॉ. वसंतराव जे राथ मार्ग हा स्वातंत्र्यवीर मार्ग ते अमेगो हॉटेल पर्यंत, एस. एच. पारकर मार्ग हा स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा मिलरनीथम बिल्डिंग पर्यंत, एस. एच. बाबरेकर मार्ग हा सुर्यवंशी हॉल जंक्शन ते व्हिजन क्रेस्ट बिल्डिंग पर्वत, किर्ती कॉलेज लेन मार्ग हा किर्ती कॉलेज सिग्नल ते मीरामार सोसायटी पर्यंत, काशीनाथ धुरु रोड हा काशीनाथ घुरु जंक्शन ते आगार बाजार सकल पर्यंत, एल. जे. रोड हा शोभा हॉटेल ते गडकरी जंक्शनपर्यंत, राजगृह परिसराच्या बाजूचा हिंदू कॉलनी रोड 1 ते 5 नंबरपर्यंत, लखनसिंग नप्पु रोड हा रुईया जंक्शन ते पाच गार्डन ते सेन्ट जोसेफ स्कुलपर्यंत, आर. ए. किडवाई रोड हा अरोरा जंक्शन ते लिज्जत पापड जंक्शनपर्यंत तर नाथालाल पारेख मार्ग सेन्ट जोसेफ स्कुल ते खालसा कॉलेजपर्यंत असे पार्किंग झोन राहणार आहेत. कुठे करणार पार्किंग ? सेनापती बापट मार्ग दादर (पश्चिम), कामगार मैदान एलफिन्स्टन, इंडिया बुल इंटरनॅशनल सेंटर, इंडिया बुल्स ०१ सेंटर, ज्युपीटर मिल कंपाऊंड एलफिन्स्टन रोड (पश्चिम), कोहिनूर स्केअर, कोहिनूर मिल कंपाऊंड दादर, लोढा, कमला मिल कंपाऊंड सेनापती बापट मार्ग लोअर परेल, पाच गार्डन, लेडी जहाँगीर रोड माटुंगा (पुर्व) व एडनवाला रोड नाथालाल पारिख मार्ग, माटुंगा (पुर्व), आर. ए. के ४ रोड, वडाळा (पश्चिम) या ठिकाणी पार्किंग करता येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनास ‘महापरिनिर्वाण दिन’ का म्हटलं जातं? पर्यायी मार्ग माहिम एल जे रोड अथवा सेनापती बापट मार्गे दक्षिणेकडे वाहनांनी कलानगर जंक्शन येथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते सायन रेल- वेस्थानक किंवा 60 फुट रोड कुंभारवाडामार्गे सायन रुग्णालय येथे वळण घेऊ शकतात. वांद्रे-वरळी सागरी उड्डाणपुलमार्गे दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करावे असा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. कुलाबाकडून बी.ए. रोडने अथवा हाजी अली मार्गे ऍनी बेझंट रोडने उत्तरवाहिनीरुन जाणाऱ्या वाहनांनी पी.डीमेलो रोड, बॉरेस्टर नाथ पै, जकेरिया बंदर रोड, आर. ए. के. रोड मार्ग यांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा ग्रीजखाली उजवे वळण घेऊन पुढे सायन हॉस्पिटल जंक्शन मार्गे, पुढे मार्गक्रमण करावे. वन-वे किंवा बंद रस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदुजा हॉस्पिटल पर्यंत वाहतूकीसाठी बंद असेल.  हिंदुजा हॉस्पिटल येथील स्थानिक नागरिक हे एस. बँक जंक्शन येथे डावे वळण घेवून पांडुरंग नाईक मार्गे राजाबडे चौक येथे जावू शकतील. Mahaparinirvan Din : सोलापूरातील भीम भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष व्यवस्था एस. के. बोले रोड उत्तर वाहिनी, सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगीच चर्च जंक्शनपर्यंत वन-वे असेल. या मार्गाच्या दक्षिण वाहिनीवरून पोर्तुगीज चर्च जंक्शनयेथून सिध्दीविनायक मंदिर जंक्शनकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे. संपूर्ण रानडे रोड, ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज रोड, केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, एम. बी. राऊत मार्ग हे सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद असतील. कटारीया मार्ग हा एल. जे. रोडच्या शोभा हॉटेल ते आसावरी जंक्शनपर्यंत वाहतूकीसाठी बंद असेल. सर्व प्रकारची जडवाहने, मालवाहतूक करणारी वाहने यांना स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या माहिम जंक्शन हर्डीकर जंक्शन पर्यंत, एल. जे. रोडच्या माहिम जंक्शन ते गडकरी जंक्शनपर्यंत, गोखले रोडच्या गडकरी जंक्शन ते धनमिल नाका पर्वत, सेनापती बापट मार्गाच्या माहिम रेल्वे स्थानक ते वडाचा नाका पर्यंत आणि टिळक ब्रिज ते एन.सी. केळकर रोडपर्यंत वाहतूकीसाठी मनाई आहे. पार्सल पाठवण्याचं टेन्शन विसरा! पोस्ट खात्यानं सुरू केली ‘वन स्टॉप’ सेवा बेस्टच्या विशेष फेऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्टने 5 ते 7 डिसेंबर दरम्यान चैत्यभूमी ते मुंबईतील विविध ठिकाणी विशेष बससेवा आणि मुंबई दर्शन उपलब्ध केले आहे. 5 डिसेंबरला दुपारी 4 ते रात्री 12 पर्यंत तीन तर 6 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत दोन तसेच 7 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते दुपारी दोनपर्यंत तीन बस चालवण्यात येणार आहे. या अतिरिक्त बसशिवाय  5 डिसेंबर रोजी रात्री 9.30 ते मध्यरात्रीपर्यंत बस क्र. 200, 241, 351 आणि 354 या मार्गावर 10 बस धावतील. 6 डिसेंबर रोजी बस क्रमांक 440, सी-33, 164, 241, सी 305, 351, अ-385, आणि सी 521 या मार्गावर एकूण 35 जादा बस चालवल्या जाणार असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेशचंद्र यांनी दिली आहे. मुंबईकरांचा बस प्रवास आणखी होणार ‘बेस्ट’ वाचा काय आहे नवा प्लॅन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील स्मृतीस्थळांना आणि दक्षिण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी बेस्टने 7 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत अरिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजी पार्क येथून 6 जादा बस धावणार आहे. प्रती प्रवासी 150 रुपये प्रवास भाडे आकारण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर येथील भागांना भेट देण्यासाठी दैनंदिन पास सुविधा उपलब्ध आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात