मुंबई, 2 डिसेंबर : मुंबईची जीवनवाहिनी लोकल नंतर मुंबईकरांचा मुंबईच्या बेस्ट बसवर विश्वास आहे. बेस्ट बसने प्रवास करणं मुंबई कर पंसत करतात. त्यामुळे प्रवाशांकरिता बेस्ट बस नेहमी काही न काही उपक्रम राबवत असते. त्यामुळे बेस्ट बस मधून प्रवास करणाऱ्यांसाठी मुंबई बेस्ट बसने आणखी एक योजना आणली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पैशाची बचत होणार आहे. काय आहे योजना? बेस्ट बसचे तिकीट सामान्यांना परवडण्याइतकेच आहे. सर्वसाधारण बससाठी कमीत कमी पाच रुपये तर एसी बससाठी कमीत कमी सहा रुपये तिकीट आहे. मात्र आता बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष योजना आणली आहे आणि ती म्हणजे ‘बेस्ट चलो ऍप’ आणि ‘बेस्ट चलो कार्ड’ वापरणाऱ्यांसाठी ‘सुपर सेव्हर’चा प्लॅन आणला आहे. बेस्ट बसच्या अधिकाऱ्यांनी याविषयी घोषणा केली आहे.
Mumbai : डिजिटल करन्सीच्या युगातही ‘इथं’ आहे जुन्या नाण्यांचा खजिना!
काय आहे सवलत? बेस्ट चलो ऍप आणि बेस्ट चलो कार्डचा वापर करून प्रवास करणाऱ्यांना कमीत कमी 20 टक्के तर जास्तीत जास्त 34 टक्के सवलत दिली जाणार आहे. हा प्लॅन बेस्ट बसच्या ऍपवर तसेच चलो कार्डवरही उपलब्ध असणार आहे. कधीपासून ‘सुपर सेव्हर’ सुरु होणार? 1 डिसेंबरपासून चलो ऍपवर सुपर सेव्हर हा प्लॅन लागू झाला आहे आणि चलो कार्डवर 3 डिसेंबरपासून लागू होणार आहे. त्यानुसार प्रवासी बेस्ट बसच्या वाहकाच्या माध्यमातून किंवा प्लॅन खरेदी करून याचा वापर करू शकणार आहेत. मुंबईत ऍप वापरकर्ते किती? मुंबईत सुमारे 30 लाख प्रवाशांनी चलो ऍप डाऊनलोड केले आहे. सुमारे 25 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी त्याचा दररोज वापर करत आहेत. नोव्हेंबरमध्ये पाच लाख डिजिटल फेऱ्या दिवसाला होत होत्या. डिजिटल तिकीट प्रणालीचा अवलंब केल्यापासून आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.
Mumbai : गाणी, सिनेमा रेकॉर्ड प्लेयवर ऐकायला आवडणाऱ्यांसाठी ‘इथं’ आहे खजिना, पाहा Video
बेस्ट बसने ही योजना का आणली? आणखी मुंबईकरांनी डिजिटल प्रणालीचा वापर करून प्रवास करावा यासाठी हा नवीन प्लॅन तयार करण्यात आला आहे. या प्लॅनमुळे डिजिटल प्रणालीचा वापर करून प्रवास करणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढेल असा विश्वास बेस्टच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सुपर सेव्हर प्लॅनचा वापर कसा करावा? 1 ) बेस्ट चलो ऍपमधील बस पास सेक्शनमध्ये हा प्लॅन आहे. 2) आपल्या आवडीनुसार प्लॅन निवडून, स्वतःची माहिती भरून ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर प्लॅनची खरेदी करता येईल. 3) बेस्ट बसमध्ये चढल्यानंतर स्टार्ट अ ट्रीप वर क्लिक करा. 4) त्यानंतर फोनद्वारे तिकीट मशिनवर व्हॅलिडेट करा. 5) व्हॅलिडेशन यशस्वी झाल्यानंतर वाहकाद्वारे डिजिटल तिकीटची प्रिंट मिळेल. अश्या पाच सोप्या स्टेप्सने तुम्ही सुद्धा सवलतीच्या दरात बेस्ट बसने प्रवास करू शकता.