मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पार्सल पाठवण्याचं टेन्शन विसरा! पोस्ट खात्यानं सुरू केली 'वन स्टॉप' सेवा

पार्सल पाठवण्याचं टेन्शन विसरा! पोस्ट खात्यानं सुरू केली 'वन स्टॉप' सेवा

एखादी मोठी वस्तू परगावी पाठवायची असेल तर कुरिअरमध्ये जास्त पैसे खर्च होतात. हे टेन्शन दूर मिटवण्यासाठी पोस्ट खातं पुढं सरसावलं आहे.

एखादी मोठी वस्तू परगावी पाठवायची असेल तर कुरिअरमध्ये जास्त पैसे खर्च होतात. हे टेन्शन दूर मिटवण्यासाठी पोस्ट खातं पुढं सरसावलं आहे.

एखादी मोठी वस्तू परगावी पाठवायची असेल तर कुरिअरमध्ये जास्त पैसे खर्च होतात. हे टेन्शन दूर मिटवण्यासाठी पोस्ट खातं पुढं सरसावलं आहे.

 • Local18
 • Last Updated :
 • Pune, India

  पुणे, 3 डिसेंबर :  एखादी मोठी वस्तू परगावी पाठवायची असेल तर ती कुरियरच्या माध्यमातून पैसे जास्त खर्च होतात. त्याचबरोबर ते पार्सल व्यवस्थित पोहचेल ना? याचीही अनेकदा काळजी असते. आपला होणारा हा खर्च आणि काळजी कमी करण्यासाठी पोस्ट खाते पुढे सरसावले आहे. भारतीय टपाल खात्यानं पुण्यातील 3 पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

  काय आहे सुविधा?

  टपाल खात्यानं प्रिमियम सेवांबरोबरच पार्सल पॅकची सेवा सुरू केली आहे. पुणे आणि परिसरातल्या लक्ष्मी रोड, पुणे हेट पोस्ट ऑफिस (साधू वासवानी चौक) आणि चिंचवड पूर्व पोस्ट ऑफिस इथं अगदी 10 रुपयांच्या नाममात्र दरापासून पार्सलच्या वजनानुसार ही सोय उपलब्ध आहे, अशी माहिती पुणे टपाल क्षेत्राचे पोस्ट मास्तर रामचंद्र जायभाये यांनी दिली आहे.

  ग्राहकांनी केवळ त्यांचे पार्सलसाठी पाठवायचे सामान घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये यायचं आहे. टपाल विभागाचे कर्मचारी हे समान अतिशय स्थित नाममात्र किमतीत पॅक करून देतील. पॅकिंगसाठी पोस्ट ऑफिसमध्ये छोटे, माध्यम आणि मोठ्या आकाराचे कार्टून बॉक्स, तसंच बबल पिंग, बँड सीलिंग आणि धर्मोपोलिस शीट आणि पार्सल पॅकिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

  मुंबईकरांचा बस प्रवास आणखी होणार 'बेस्ट' वाचा काय आहे नवा प्लॅन

   एप्रिल 2022 पासून 8535 ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. याबाबत बोलताना श्री रामचंद्र जायभावे म्हणाले की, 'तीन्ही पॅकिंग युनिटला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. पण, या उत्तम सेवेबद्दल सामान्य नागरिकांना फारशी माहिती नसल्यानं आणखी जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.

  24 तास सेवा

  पुणे रेल्वे स्टेशनवरी प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळच्या पोस्ट ऑफिस बुकिंग काऊंटरवर स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्टबरोबरच पार्सल बुकिंगची 24 तास सुविधाही या महिन्यापासून सुरू झाली आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात या काऊंटरवर एकूण 53,667 ग्राहकांनी स्पीड पोस्ट 22 ग्राहकांनी पार्सल आणि 53073 ग्राहकांनी रजिस्टर पोस्ट सेवांचा लाभ घेतला आहे.

  टपाल खात्याकडून पार्सल बुकिंग झाल्यापासून ते योग्य स्थळी वितरित होईपर्यंत प्रत्येक पातळीवर एसएमस पाठवला जातो. त्याचबरोबर पाठवलेल्या पार्सलचे ट्रॅकिंग इंटरनेटवर आणि पोस्ट ऑफिस इन्फो या पोस्टाच्या मोबाईल अ‍ॅपवरही करता येते. त्याचबरोबर बुकिंग पासून वितरित होईपर्यंत प्रत्येक पायरीवर ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविला जातो आणि पाठविलेल्या पार्सलचे ट्रॅकिंग, इंटरनेटवर आणि पोस्ट इन्फो या पोस्ट ऑफिसच्या मोबाइल अ‍ॅपवरही  करता येते. या व्यतिरिक्त पोस्ट इन्फो या मोबाइल अ‍ॅपवर पोस्ट ऑफिसमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व सेवाची माहिती सुद्धा पाहता येते.

  पार्सल पॅकिंग आणि रेल्वे स्टेशन बुकिंग काऊंटरवर 24 तास मिळणाऱ्या पोस्टाच्या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त जनतेने घ्यावा असे आवाहन जायभाये यांनी केले आहे.

  First published:

  Tags: Local18, Post office, Pune