Home /News /maharashtra /

अजबच 'शिमगा'... घोड्यावरून नाही, गाढवावरून काढली जाते जावयाची मिरवणूक

अजबच 'शिमगा'... घोड्यावरून नाही, गाढवावरून काढली जाते जावयाची मिरवणूक

नाराज झालेल्या जावयला कपड्यांचा मनपसंत आहेर व सासर्‍यांकडून सोन्याची अंगठी दिली जाते.

बीड 10 मार्च :  जावयाची घोड्यावरील मिरवणूक तर सर्वांनी पाहिली असेल मात्र बीड जिल्ह्यातील विडा गावांत जावयाची मिरवणूक काढली जाते पण ती गाढवावर. कायम रुबाबात आणि ऐटीत मिरवणारे जावई बापु चक्क गाढवावर मिरवणूक निघेल या भीतीने धूम ठोकतात पण विडा गावांतील लोक जावयाचा शोध घेतं त्यांना पकडून आणून गाढवावर बसवतात. ही या गावातील आगळी वेगळी परंपरा आहे. 101वर्षां पूर्वी सुरु झालेल्या या परंपरेला अद्याप खंड पडला नाही. या वर्षीय या शाही मिरवणुकीचे मानकरी जावाई ठरले दत्तात्रय संदीप गायकवाड ते मसाजोगचे  रहिवाशी आणि विडा गावांतील बाळासाहेब मोहन पावर यांचे जावई आहेत.

केज तालूक्यातील विडा या गावी धुलीवंदनाच्या दिवशी. जावायाला गाढवावरून मिरवण्याची परंपरा आहे. जावाई म्हटले की सासरकडील मंडळींकडून जावयाचा थाट व रुबाब आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहाण्यासाठी मिळाला असेल. पण विड्याचं मात्र आपल्याला जावयाच्या बाबतीत थोड वेगळं चित्र पाहावयास मिळेल. धुलीवंदनाच्या दिवशी जावायाला गाढवावरून मिरवण्याची परंपरा गेल्या 101 वर्षापासून या गावात आहे ही परंपरा आहे.

गावातले ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला गावकर्‍यांनी धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावर बसून त्यांची गावभर मिरवणूक काढली होती, तेव्हा पासून गाढवावर जावयाची मिरवणूक काढली जाते. त्यांत  गाढवाच्या गळ्यात खेटराची माळ घालून फिरवले जाते व गावभर जावयाची धिंड काढल्यानंतर त्यांचा गावातील  हनुमान मंदिराच्या पारावर मोठ्या मानापानाणे नाराज झालेल्या जावयला कपड्यांचा मनपसंत आहेर व सासर्‍यांकडून सोन्याची अंगठी दिली जाते. यावर्षी तो मान दत्ता संदीप गायकवाड  यांना मिळाला.

हे वाचा - "लोक आताही मला असं म्हणतात...", सावत्र आईच्या टॅगमुळे करीना कपूर वैतागली

गावभर डॉल्बी व बँडबाज्याच्या तालावर नाचणारी  पोरं आणि त्यांच्या अंगावर गल्लो गल्ली उधळला जाणारा रंग असा रंगारंग  हा कार्यक्रम असतो. गाढवावरून गावभर मिरवल्यानंतर  शेवटी मारुती च्या पारावर   सरपंच व गावकऱ्यांच्या हस्ते कपड्यांचा आहेर व सासर्‍यांकडून सोन्याची अंगठी असा आहेर चढवन्यात येतो. एकदा नंबर लागल्यानंतर त्याच जावयाला ही संधी मिळत नाही.

हे वाचा -‘या’ आहेत ज्योतिरादित्य यांच्या पत्नी, 50 सुंदर महिलांमध्ये झाला होता समावेश

राज्यात सर्वत्र होळीची धूम सुरु असतानाच बीड जिल्ह्यात केज तालुक्यात आज ही शंभर वर्षाची जुनी परंपरा आजही तितक्याच उत्साहाने ग्रामस्थ साजरी करत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या गावांतील लोक शोधत होते तें गाढव आणि गाढवावर बसणारा जावई. काळाच्या ओघात या गावांतील गाढवं कमी झाली, प्रत्येक वर्षी गाढव मिळायची पण यावर्षी गाढव शोध घ्यावा लागलं नंतर ते भाड्याने मिळाले आणि ही गेल्या अनेकवर्षांची परंपरा  टिकली. या यावर्षी मात्र गाढव नसल्याने मिरवणूक होती कीं नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. पण नंतर मात्र दोन्हीही सापडले आणि परंपरा कायम राहिली.

Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Holi celebration

पुढील बातम्या