मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

‘कोरोना’चा फटका, राज्यातल्या सरकारी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

‘कोरोना’चा फटका, राज्यातल्या सरकारी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

' प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत. लोकांनी घाबरू नये मात्र काळजी घ्यावी.'

' प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत. लोकांनी घाबरू नये मात्र काळजी घ्यावी.'

' प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत. लोकांनी घाबरू नये मात्र काळजी घ्यावी.'

पुणे 10 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने सरकारने तातडीने तयारी सुरु केली आहे. मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. सर्व हॉस्पिटल्समध्ये युद्ध पातळीवर तयारी करण्यात येत आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सरकारी हॉस्पिटल्समधल्या सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत अशीही माहिती त्यांनी दिली. पुणे आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबतही अजित पवारांनी बैठक घेऊन आढाला घेतला असून उपाययोजना करण्यात कुठलीही कसर ठेवू नका अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, पुण्यात ‘कोरोना’चे दोन रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पुणे महापालिकेने युद्ध स्तरावर कामाला सुरुवात केलीय. कोरोनाच्या रुग्णांसाठी वेगळ्या हॉस्पिटलची आणि आयसोलेशन वॉर्डसची गरज असल्याने अवघ्या काही तासांमध्ये पालिकेने 200 खाटांची व्यवस्था केली असून लवकरच हे तात्पुरतं हॉस्पिटल सुरु होणार आहे. राजयोग सोसायटी आणि सणस मैदानातील इमारतीत हे तात्पुरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोनाची लागण झालेल्या 2 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टरांचे पथक आणि इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची महिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. संबधित - पुण्यात ‘कोरोना’चा प्रवेश, पालिकाने काही तासांमध्ये उभारलं 200 खाटांचं रुग्णालय कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. विभागीय आयुक्तालृयात तातडीची बैठक झाली. यात विभागीय आयुक्त, कलेक्टर, पालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी बैठकीत हजर आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरूअसून त्यांना खास वॉड्समध्ये ठेवण्यात येणार आहे.

संबधित -  'कोरोना'मुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका, 58 नागरिक मायदेशी परतले

देशातल्या इतर राज्यांनंतर आता महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाव्हायरस (Coronavirus) पोहोचला आहे. पुणे (Pune) शहरात कोरोनाव्हायरसचे 2 रुग्ण सापडलेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे दोन्ही रुग्ण दुबईहून (Dubai) महाराष्ट्रात परतले होते.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Corona virus, Corona virus in india

पुढील बातम्या