मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई-पुण्यात सगळ्या सवलती रद्द; नागरिक लॉकडाऊन पाळत नसल्यामुळे उद्धव ठाकरेंचा निर्णय

मुंबई-पुण्यात सगळ्या सवलती रद्द; नागरिक लॉकडाऊन पाळत नसल्यामुळे उद्धव ठाकरेंचा निर्णय

Prayagraj: A graffiti on a road informs passersbies to follow lockdown guidelines during the nationwide lockdown to curb the spread of coronavirus, in Prayagraj, Friday, April 17, 2020. (PTI Photo)(PTI17-04-2020_000051B)

Prayagraj: A graffiti on a road informs passersbies to follow lockdown guidelines during the nationwide lockdown to curb the spread of coronavirus, in Prayagraj, Friday, April 17, 2020. (PTI Photo)(PTI17-04-2020_000051B)

निर्बंध न पाळता नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरू केल्याने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

मुंबई, 21 एप्रिल :  मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन असूनही रुग्णसंख्या कमी होत नाही. लोक निर्बंध नियम पाळत नसल्याचं लक्षात आल्यामुळे अपेक्षित लॉकडाऊन सवलती देता येणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरू केल्याने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे.

कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी  लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई- पुणे भागासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. 20 एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरू केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही नाराजी व्यक्त केली होती. तसेच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशाराही दिला होता.

वाचा - वृत्तपत्रांचं आणि अत्यावश्यक सामानाचं घरोघरी वितरण : सरकारने बदलला नियम

गेल्या 24 तासांत राज्यात 552 नवीन रुग्ण दाखल झाले, यातले 419 एकट्या मुंबई महानगरात सापडले आहेत. दिवसभरात 19 रुग्णांचा मृत्यू राज्यात नोंदला गेला. आजपर्यंत मुंबईत 3451 रुग्ण झाले आहेत, तर 151 मृत्यू झाले आहेत. आज 150 पूल गुणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आतापर्यंत राज्यात करुणा बाधित 722 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.

राज्यात अन्यत्र लॉकडाऊन शिथिलता

लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने 17 एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली असून मुंबई आणि पुण्यासाठी ती लागू असेल. म्हणजेच 17 एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई आणि पुण्यासाठी लागू राहील. उर्वरित राज्यात 17 एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.

ई कॉमर्स कंपन्यांना  इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द करण्यात आली आहे . त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आणि वैद्यकीय उपकरणं यांचीच वाहतूक करता येईल.

वाचा - गोव्याने असं केलं तरी काय? ज्यामुळे ठरलं कोरोनामुक्त होणारं देशातलं पहिलं राज्य

फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हेही मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहतील.

बांधकामंदेखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील. तसंच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून घ्यायचं आहे. राज्यभरात  वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अन्य बातम्या

रॅपिड टेस्टिंगवर 2 दिवस बंदी; निकालातील गोंधळामुळे ICMR कडे तक्रार

रोहित पवार भडकले, ‘भाजपला कोरोनाशी नाही फक्त राजकारणाशी देणं घेणं’

First published:

Tags: Coronavirus, Pune (City/Town/Village)