मराठी बातम्या /बातम्या /देश /

Coronavirus : रॅपिड टेस्टिंग सुरू झाल्यानंतर काही दिवसात बंदी; निकालात गोंधळ असल्याने ICMR कडे तक्रारी

Coronavirus : रॅपिड टेस्टिंग सुरू झाल्यानंतर काही दिवसात बंदी; निकालात गोंधळ असल्याने ICMR कडे तक्रारी

हा नॅशनल एक्सपर्ट ग्रुप (National Expert Group) केंद्र सरकारने तयार केला असून त्यात संबंधित सर्व विभागांचे प्रतिनिधी आहेत.

हा नॅशनल एक्सपर्ट ग्रुप (National Expert Group) केंद्र सरकारने तयार केला असून त्यात संबंधित सर्व विभागांचे प्रतिनिधी आहेत.

आतापर्यंत 4 लाख 49 हजार 810 चाचण्या झाल्या आहेत. सोमवारी 35 हजारहून जास्त टेस्ट किटचे वाटप करण्यात आले आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 21 एप्रिल : कोरोना व्हायरसची (Coronavirus) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. यादरम्यान भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद म्हणजेच ICMR ने रॅपिड टेस्टिंग किटबाबत एक निर्देश जारी केला आहे. आयसीएमआरने मंगळवारी सायंकाळी प्रेस वार्तामध्ये सांगितले की, सर्व राज्यांमध्ये रॅपिड टेस्ट किट देण्यात आल्या आहेत. मात्र काही राज्यांकडून या किट संदर्भात तक्रारी येत आहेत. त्यामुळे आयसीएमआरने चाचणीवर बंदी आणली आहे. त्यामुळे आयसीएमआरने पुढील 2 दिवस रॅपिड टेस्ट किटचा उपयोग न करण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत 4 लाख 49 हजार 810 चाचण्या झाल्या आहेत. सोमवारी 35 हजारहून जास्त टेस्ट किटचे वाटप करण्यात आले आहे.

राजस्थानने परीक्षण थांबवले

कोरोनाचा निकाल योग्य येत नसल्याच्या कारणाने राजस्थान सरकारने या किटचा उपयोग तातडीने थांबवला. आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी सांगितले की, या किटच्या तपासाच्या निर्णयाचा तपशील आयसीएमआरला पाठविण्यात आला आहे. मंत्रीनी दिलेल्या माहितीनुसार यातून केवळ 5 टक्के वैध परिणाम मिळतात.

डॉ. रघु शर्मा म्हणाले, यापूर्वी संक्रमित झालेल्या 168 प्रकरणांमध्ये या किटची चाचणी घेण्यात आली आहे, परंतु केवळ 5.4 टक्के निकाल योग्य आला आहे आणि जर निकाल योग्य नसतील तर चाचणी करून काय फायदा? ते म्हणाले, 'तसेही या चाचण्या अंतिम नव्हत्या कारण त्यानंतर पीसीआर चाचण्या घ्याव्या लागतात. या तपासणीचा काही उपयोग होत नाही असा सल्ला आमच्या डॉक्टरांच्या पथकाने दिला आहे. राज्य सरकारने आयसीएमआरला हे निकाल पाठवले आहेत आणि या चाचणी किटचा वापर सुरू ठेवावा की नाही हे विचारले आहे. पश्चिम बंगाल सरकारनेही या चाचण्या खराब असल्याचा आरोप केला आहे.

संबंधित -परदेशातून Covid-19 रुग्णांचे मृतदेह आणता येतील का? आरोग्य मंत्रालयाचे गाइडलाइन्स

First published: