पणजी, 21 एप्रिल : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गोव्याने मात्र कोरोनामुक्ती करून दाखवली. यासह गोवा हे कोरोना मुक्त झालेलं देशातील पहिलं राज्य ठरलं. कोरोनाचा एकही रुग्ण आता गोव्यामध्ये नाही. यासाठी सरकारने खास पावलं उचलली होती. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्य कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं. तसं नागरिकांना आवाहनही केलं की, आतापर्यंत जसं लॉकडाऊनचं पालन केलंत तसंच 3 मेपर्यंत रहा. गोव्यात कोरोनाचे सात रुग्ण आढळले होते. त्यानंतर राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. तसचं सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आले. उपचारानंतर सर्व सातही रुगण बरे झाले. याशिवाय राज्यात कोरोनाचे रुग्णही आढळलेले नाहीत. कोरोनाला रोखण्यात आलेल्या यशाचं श्रेय कोविड 19 टीम, पॅथॉलॉजी लॅबची टीम आणि प्रशासनाला देण्यात येत आहे. याशिवाय राज्याने 22 मार्चचा जनता कर्फ्यू 23 आणि 24 मार्चलासुद्धा कायम ठेवला होता. त्यामुळेच कोरोना व्हायरसला रोखता आलं. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच गोव्याच्या सीमा सील करण्यात आल्या. राज्याच्या सीमा सील केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटवण्यात आली. त्या सर्वांना क्वारंटाइन करून त्यांची टेस्ट कऱण्यात आली. तसंच गोव्यात परदेशातून आलेल्यांचा सर्व्हे करण्यात आला. त्यापैकी कोणाला कोरोनाची लागण झाली नाही ना याचीही तपासणी केली गेली. यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबला. हे वाचा : कुणामार्फत पसरला कोरोनाव्हायरस? जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं उत्तर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारच्या गाइडलाइनचं पालन करू. फार्मा कंपन्या आणि फूड इंडस्ट्रीज पहिल्यापासून सुरू आहेत. केंद्राने दिलेल्या आदेशानुसार 20 एप्रिलपासून ज्या कंपन्यांना सूट मिळाली आहे त्यांना अटींवर परवानगी दिली आहे. त्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावंच लागेल. हे वाचा : वृत्तपत्रांचं आणि अत्यावश्यक सामानाचं घरोघरी वितरण : सरकारने बदलला नियम पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात कोरोनाला अटकाव करणं कठीण जाईल असं मानलं जात होतं. राज्यात 12 महिने देश, विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र तरीही राज्यात सर्व नियमांचं पालन केल्यामुळं कोरोना मुक्त होण्यात देशात पहिला क्रमांक पटकावला. हे वाचा : GOOD NEWS : चिंता वाढत असताना मुंबईने करून दाखवलं, बऱ्या झालेल्या रुग्णांचं शतक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.